Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 53व्या वर्षीही इतकी सुंदर दिसते ही मराठमोळी अभिनेत्री, शूटिंगदरम्यान घडली होती ही धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 10:37 IST

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयकौशल्याने अर्चना जोगळेकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लहानपणापासूनच अतिशय चाणाक्ष असलेल्या अर्चना यांनी कथ्थक नृत्यकलेचे धडे त्यांची आई आणि गुरु आशा जोगळेकर यांच्याकडून घेतले आहेत.

अर्चना जोगळेकर या नव्वदीचे दशक त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने गाजविले. यादरम्यानच 1997 साली एका विकृत माणसाने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. 30 नोव्हेंबर 1997 साली अर्चना जेव्हा ओडिसा येथे एका चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्यावेळी त्या पंथा निवास येथे राहत होत्या. तेव्हा रात्री तिथे भुबानानंदा पंडा हा इसम गेला आणि अर्चना यांचा ऑटोग्राफ घेण्याच्या बहाण्याने त्यांच्या खोलीत शिरुन त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. डिसेंबर 1997 रोजी त्या माणसाला पकडण्यात आले होते आणि एप्रिल 2010 साली त्याला 18 महिने कारावासाची शिक्षा भुवनेश्वर फास्ट ट्रॅक कोर्टाने सुनावली.

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयकौशल्याने अर्चना जोगळेकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लहानपणापासूनच अतिशय चाणाक्ष असलेल्या अर्चना यांनी कथ्थक नृत्यकलेचे धडे त्यांची आई आणि गुरु आशा जोगळेकर यांच्याकडून घेतले. केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर अर्चना उच्चशिक्षीतही आहेत आणि त्यांनी वकिलीची डबल डिग्री प्राप्त केली आहे. 

अर्चना या सध्या लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या आहेत. पण त्यांचे नृत्यप्रेमाने त्यांना तिथेही स्वस्थ बसू दिले नाही. अर्चना यांनी विदेशात म्हणजेच न्यू जर्सी येथे अर्चना नृत्यालय उघडले आहे आणि तिथे अनेक विद्यार्थ्यांना त्या कथ्थक नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देतात. अर्चना यांना सुर श्रृंगार समसाद यांच्याकडून 'श्रृंगार मनी' आणि हिंदी साहित्य परिषद यांच्याकडून 'नृत्य भारती' हा पुरस्कारही मिळाला आहे.