Join us

​भेटली तू पुन्हाच्या शीर्षक गीताची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 10:26 IST

‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचे टायटल साँग सध्या तरुणाईमध्ये गाजतंय. अतिशय तरल चाल, मनाला भावणारे शब्द आणि वैभव तत्त्ववादी ...

‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचे टायटल साँग सध्या तरुणाईमध्ये गाजतंय. अतिशय तरल चाल, मनाला भावणारे शब्द आणि वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंतची केमिस्ट्री यामुळे ‘लव्ह अँथम’ बनलेले हे गाणं आधी चित्रपटाचा भाग नव्हतं. परंतु चित्रीकरणादरम्यान वैभव तत्ववादी आणि गाण्याचे संगीतकार विवेक देऊळकर यांनी हे गाणं चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांना ऐकवले आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी ते चित्रपटाचे शीर्षकगीत म्हणून डिक्लेअर केलं. हे गाणे संजय जमखंडी यांनी लिहिले असून निखिल मोदगी यांनी गायले आहे.   एखादी व्यक्ती आवडली तर पहिल्याच नजरेत आवडते असं म्हणतात. पहिल्याच भेटीत तिच्याशी जन्मोजन्मीचे नाते निर्माण होते. या पहिल्याच नजरेत घडणाऱ्या प्रेमाबद्दल खूप काही लिहिले, बोलले गेले आहे. प्रेम जरी आयुष्यात एकदाच होत असले तरी एकाच व्यक्तीच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडण्याची जादू काही औरच असते आणि म्हणूनच स्वरूप रीक्रिएशन अँड मीडिया प्रा. लिमिटेड प्रस्तुत, गणेश हजारे निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट खास आहे. हा चित्रपट मुंबई ते गोवा या प्रवासादरम्यान फुलणाऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे. अतिशय फ्रेश दिसणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण प्रदीप खानविलकर यांनी केले असून संकलन सतीश पाटील यांचे आहे तर पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी यांच्या लुकचे श्रेय संतोष गावडे यांना जाते. प्रेम या संकल्पनेला पुन्हा नव्याने भेटवणारा हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. Also Read : 'भेटली तू पुन्हा'च्या टीममधील वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांनी लोकमत ऑफिसला दिली भेट