Join us

'तुझं तू माझं मी' सिनेमात दिसणार आई-मुलाची बॉण्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 12:12 IST

मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील पॉप्युलर आणि सर्वांची लाडकी स्क्रीन-मदर म्हणजेच सविता प्रभुणे आता ललित प्रभाकरची आई बनलत ...

मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील पॉप्युलर आणि सर्वांची लाडकी स्क्रीन-मदर म्हणजेच सविता प्रभुणे आता ललित प्रभाकरची आई बनलत रसिकांच्या भेटीला झळकणार आहेत.सविता प्रभुणे यांनी अनेक मराठी व हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रेमळ आईची भूमिका निभावली आहे. एका हळव्या आणि गोड आईच्या भूमिकेला अत्यंत साजेश्या असणाऱ्या सविता प्रभुणे यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने सर्वांच्या मनात घर केलं आहे.आता ही प्रेमळ स्क्रीन-मदर TTMM (तुझं तू माझं मी) या आगामी चित्रपटात ललित प्रभाकरच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. सविता प्रभुणे आणि ललित प्रभाकर हे पहिल्यांदाच आई आणि मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत त्यामुळे प्रेक्षक देखील मोठ्या पडद्यावरील या आई-मुलाची बॉण्डिंग आणि केमिस्ट्री एन्जॉय करतील यात शंका नाही.TTMM (तुझं तू माझं मी) हा चित्रपट येत्या १६ जुनला प्रदर्शित होणार आहे.ललित सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असल्यामुळे तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो.तो त्याच्या सिनेमाविषयी प्रत्येक गोष्ट त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो.त्यामुळे रसिकांनाही या सिनेमाविषयी कमालीची उत्सुकता लागली आहे.तसेच नेहा महाजन आणि ललित प्रभाकर यांची हटके जोडी या सिनेमात झळकणार आहे.नेहाने यापूर्वी यूथ,फ्रेन्ड्स, निळकंठ मास्तर यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तर ललित 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे.त्यामुळे ललित प्रभाकर आणि नेहा महाजन या दोघांची केमिस्ट्री रूपेरी पडद्यावर काय कमाल दाखवते हे पाहणे रंजक ठरणार आहे.