Join us

"तू सिनेमा जगणारा माणूस आहेस आणि...", कुशल बद्रिकेची संजय जाधव यांच्यासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:15 IST

Kushal Badrike : कुशल बद्रिकेने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

कुशल बद्रिके (Kushal Badrike) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. लवकरच तो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. तो या कार्यक्रमाबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान कुशल बद्रिकेने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय जाधव यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने कुशल बद्रिकेने त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, ''जगात जेवढे डाएट प्लान्स उपलब्ध आहेत, ते सगळे करूनही 'एका इंचानेही' कमी न झालेल्या संजू दादा, तुला “हॅप्पी बर्थ डे”! तू सिनेमा जगणारा माणूस आहेस, आणि आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच तुझा “येरे येरे पैसा ३” हा सिनेमा रिलीज होतोय. ह्या सारखा 'दुग्ध-शर्करा' योग नाही! आज त्याच दुधाने तुझं तोंड गोड करायला हवं, पण कुठल्याश्या डाएट प्लानमुळे तू साखर बंद केल्याचं नुकतंच कळलंय. त्यामुळे ते राहू दे.''

त्याने पुढे म्हटले की, ''दादा, आज तुझ्या वाढदिवसाला देवाकडे प्रार्थना करतो की डाएटशिवाय तुझं वजन कमी होऊ दे, आणि ह्या 'येरे येरे पैसा ३' मुळे मनोरंजन क्षेत्रातलं तुझं वजन अजून-अजून वाढत राहू दे. हॅप्पी बर्थ डे दादा! आणि आय लव्ह यू.''

'येरे येरे पैसा ३' झाला रिलीजमराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट 'येरे येरे पैसा ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट आज म्हणजेच १८ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :कुशल बद्रिकेसंजय जाधव