योगेश सोहोनी झळकणार चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 16:21 IST
प्रत्येकाची एक फेव्हरेट मालिका असते. ही मालिका संपली की, कलाकार नाराजी व्यक्त करतात. मात्र आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकार पुन्हा ...
योगेश सोहोनी झळकणार चित्रपटात
प्रत्येकाची एक फेव्हरेट मालिका असते. ही मालिका संपली की, कलाकार नाराजी व्यक्त करतात. मात्र आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकार पुन्हा कधी भेटणार याकडे ही प्रेक्षक डोळे लावून बसलेल्या असतात. म्हणूनच आता, अस्मिता या मालिकेतील सिड म्हणजेच योगेश सोहोनी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. अस्मिता ही मालिका संपली असली, तरी प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता लवकरच एका आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे त्याचे पुर्नगमन आणि चित्रपट असा डबल धमाका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.त्याच्या या चित्रपटाचे नाव ड्राय डे असे आहे. या चित्रपटाचा मुहुर्त नुकताच संपन्न झाला आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित हा चित्रपट आहे. तर या चित्रपटाचे निर्माते संजय पाटील असून डीओपी नागराज एम. डी. हे आहेत. नुकतेच या कलाकाराने चित्रपटाशी संबंधित सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. त्याने आपल्या या पोस्टच्या माध्यमातून सांगितले, एक नवीन प्रोजेक्ट, एक नवी सुरुवात.. त्याचबरोबर आपल्या या नवीन प्रोजेक्टने योगेशदेखील खूपच आनंदित असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या नविन इनिंगला सोशलमीडियावर खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. योगेश सोहोनी हा अस्मिता या मालिकेतील एक भाग होता. तो अस्मिताच्या टीममधीलच सदस्य दाखविण्यात आला आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच त्याच्यासोबत मनाली म्हणजेच काव्या मानेच्या अभिनयानेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या दोघांची या डिटेकटिव्ह मालिकेतील छोटीसी प्रेमकहानीनेदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. चला तर पाहूयात योगेश सोहोनीची नवीन सुरूवात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का.