Join us

2016 या वर्षात सैराट या चित्रपटासोबतच कोणकोणत्या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 15:27 IST

2016 हे वर्षं मराठी चित्रपटसृष्टीसाठी आतापर्यंतचे सगळ्यात चांगले वर्षं ठरले असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या वर्षी प्रदर्शित ...

2016 हे वर्षं मराठी चित्रपटसृष्टीसाठी आतापर्यंतचे सगळ्यात चांगले वर्षं ठरले असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या वर्षी प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाचे कौतुक मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीनेदेखील केले. जाणून घेऊया सैराटसोबतच 2016 ला कोणकोणते चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.सैराटसैराट या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेले आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट होता. पण या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सगळ्यांनीच कौतुक केले. केवळ एका चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या याआधीच्या फँड्री चित्रपटानेदेखील प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवली होती. सैराट या चित्रपटातील अजय-अतुलने संगीतबद्ध केलेली सगळीच गाणी प्रचंड गाजली. झिंगाट या गाण्याने तर लोकांना अक्षरशः वेड लावले. नटसम्राटनाना पाटेकरांच्या नटस्रमाट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटातील नाना पाटेकर आणि मेधा मांजरेकरच्या अभिनयाचे सगळ्यांनीच कौतुक केले. व्हेंटिलेटरफेरारी की सवारी या चित्रपटामुळे नावारूपाला आलेल्या राजेश मापुसकरने व्हेंटिलेटर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तर या चित्रपटाद्वारे अभिनेत्री प्रियांका चोप्रा मराठी चित्रपटांच्या निर्मितीच्या क्षेत्रात उतरली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. जितेंद्र जोशीच्या अभिनयाचे तर अनेकांनी कौतुक केले. वजनदारप्रिया बापट आणि सई ताम्हणकर या दोघींनीही वजनदार या चित्रपटासाठी वजन वाढवले होते. त्यामुळे दोघींसाठी हा चित्रपट खूपच स्पेशल होता. या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. गुरूअंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांची गुरू या चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. पोस्टर गर्लसोनाली कुलकर्णी, हृषिकेश जोशी, जितेंद्र जोशी यांच्या पोस्टर गर्ल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.