Join us

यशोमन आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर फ्रेश जोडी 'तू इथे जवळी राहा'मधून भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 17:33 IST

यशोमन आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर फ्रेश जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वेगवेगळ्या टीव्ही मालिकांतून चमकलेले आणि तरुणाईचे फेव्हरिट यशोमान आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र आले आहेत. 'नको रुसवा नको दुरावा, सतत वाटे तू इथे जवळी रहा' असे शब्द असलेला हा म्युझिक व्हिडिओ २७ फेब्रुवारीला सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज होत आहे.

सप्तसूर म्युझिक-फिल्मी आऊल स्टुडिओझ या म्युझिक व्हिडिओचे  प्रस्तुतकर्ते आणि साईनाथ राजाध्यक्ष निर्माते आहेत. कृतिक मझीर म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर आहेत. अनिरुद्ध बांदिवडेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. चार्वाक माधुरी यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केले आहे, तर आदित्य नीला यांनी गाणं गायलं आहे. गाण्याचे संगीत संयोजन आणि प्रोग्रॅमिंग ध्रुव मुळे आणि शंतनू सपकाळ यांचे आहे. अंंकित शिंदे आणि दिव्या घाग कार्यकारी निर्माते आहेत. 

यंग आणि फ्रेश जोडी, उत्तम संगीत आणि गीत, नेत्रसुखद छायांकन या म्युझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सप्तसूर म्युझिकच्या या पूर्वीच्या म्युझिक व्हिडिओंनाही लाखो व्ह्यूजच्या रुपानं उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे तू इथे जवळी रहा हा म्युझित व्हिडिओसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळवेल यात शंका नाही. 

टॅग्स :यशोमन आपटे