शशांक बनणार लेखक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 13:41 IST
होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री म्हणजेच अभिनेता शशांक केतकर अभिनयानंतर लेखनाकडे वळण्याचा विचार करत असल्याचे कळतेय. ...
शशांक बनणार लेखक
होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री म्हणजेच अभिनेता शशांक केतकर अभिनयानंतर लेखनाकडे वळण्याचा विचार करत असल्याचे कळतेय. शशांक सध्या एक कथा लिहित असून या कथेवर भविष्यात चित्रपट करण्याचा त्याचा विचार आहे. प्रेक्षकांनी शशांकवर एक अभिनेता म्हणून भरभरून प्रेम केले. एक लेखक म्हणून ते शशांकला नक्कीच स्वीकारतील अशी त्याला आशा आहे.