Join us

लेखक-दिग्दर्शक अजेय झणकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 22:43 IST

‘सरकारनामा’ या दमदार चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीवरील मरगळ दूर करून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे आणणारे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अजेय झणकर यांचे वयाच्या ...

‘सरकारनामा’ या दमदार चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीवरील मरगळ दूर करून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे आणणारे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अजेय झणकर यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. पुणे येथील एका खासगी रुग्णालयात ते गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन कन्या असा परिवार आहे.अजेय झणकर गेल्या काही दिवसांपासून यकृताच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रु ग्णालयात गेल्या तीन आठवड्यांपासून उपचार सुरू होते. झणकर यांनी लिहिलेल्या ‘सरकारनामा’ आणि ‘द्रोहपर्व’ या दोन्ही कादंबºया विशेष गाजल्या. पुढे त्याच्या अनेक आवृत्याही निघाल्या.या दोन्हीही कादंबºयांवर चित्रपट तयार झाले. ‘सरकारनामा’ हा राजकीय चित्रपट होता तर ‘द्रोहपर्व’ कादंबरीवर इंग्रजीमध्ये चित्रपट आला. झणकरांनी ‘लेकरू’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांची ‘दौलत’ या शीर्षकाची मालिका प्रचंड गाजली होती. ‘सरकारनामा’ हा चित्रपट आणि ‘द्रोहपर्व’ ही कादंबरी या दोन्हीला राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झणकर यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते पुरस्कारप्राप्त गीतकारसुद्धा होते.झणकर यांचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. पुरु षोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी लेखनाचे विशेष पारितोषिक पटकाविल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खºया अर्थाने सुरु वात झाली होती. झणकर यांनी जाहिरात क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. मार्केट मिशनरीज संस्थेचे ते संस्थापक होते.