Join us

बाबांची शाळा या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 12:30 IST

बाबांची शाळा या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता प्रेक्षकांची ही उत्सुकता  लवकरच पूर्ण ...

बाबांची शाळा या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता प्रेक्षकांची ही उत्सुकता  लवकरच पूर्ण होणार आहे. कारण या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. हा प्रिमियर पाच फेब्रुवारीला स्टार प्रवाह वाहिनीवर होणार आहे.                     कठीण परिस्थितीमध्ये केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या चांगल्या मनाच्या कैद्याची जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. नीला सत्यनारायण असे या कैदयाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. विराज यांनी केलं आहे. एखाद्याने केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला मिळालेली शिक्षा ही केवळ त्याच्यापुरतीच रहात नाही, तर त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला सोसावी लागते. रागाच्या भरात हातून गंभीर गुन्हा घडल्यानंतर महिपत घोरपडेला न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते. या कटू अनुभवावर महिपत कशा पद्धतीनं मात करतो त्याचबरोबर आपल्या लहान मुलीबरोबरचं भावनिक नातं कसं जपतो यावर कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे.                या चित्रपटात सयाजी शिंदे आणि  शशांक शेंडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर या कलाकारांसोबत ऐश्वर्या नारकर, कमलेश सावंत, छाया कदम, आरती मोरे, कार्तिक चव्हाण, उमेश बोळके, मिलिंद अधिकारी या कलाकारांचा समावेश आहे. तर या चित्रपटात बाल कलाकार म्हणून गौरी देशपांडे आहे. या चित्रपटातील तगडा अभिनेता सयाजी शिंदे यांना नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. तसेच ते आपल्या समाजकार्यानेदेखील प्रेक्षकांचे मनं जिंकत आहे. त्यांनी आई, माझी माणसं, वझीर, लढाई, जय महाराष्ट्र, दोन घडीचा डाव असे अनेक हीट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. तसेच बॉलिवुड चित्रपटाच्या माध्यमातूनदेखील त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.