सोनालीला करायचेय चिन्मय सोबत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:38 IST
प्रत्येक कलाकाराचे आपल्या भुमिकेविषयी काहीतरी स्वप्न असतेच. एखादा तरी ड्रीमरोल असतोच असतो. एवढेच नाही तर अमुक अमुक हिरो ...
सोनालीला करायचेय चिन्मय सोबत काम
प्रत्येक कलाकाराचे आपल्या भुमिकेविषयी काहीतरी स्वप्न असतेच. एखादा तरी ड्रीमरोल असतोच असतो. एवढेच नाही तर अमुक अमुक हिरो किंवा हिरोईन सोबत काम करायची इच्छा देखील असते. काही वेळा हे स्टार्स यागोष्टी जाहीरपणे बोलुन दाखवतात तर काहीजण मनातच ठेवतात. डॉ.प्रकाश बाबा आमटे, अग बाई अरेच्चा २ यासारख्या दर्जेदार चित्रपटांतून आपल्या अभिनयाच्या छटा प्रेक्षकांच्या मनावर उमटविणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीचे देखील असेच स्वप्न आहे. नाना पाटेकर यांच्यासह जिने स्क्रीन शेअर केली आहे, जिच्यासोबत अनेकांना काम करण्याची इच्छा आहे तिला मात्र काम करायचेय चिन्मय मांडलेकर सोबत. चिन्मय मांडलेकरला टष्ट्वीटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोनाली म्हणते होप टु वर्क विथ यु सुन. या वाक्यातूनच तिला चिन्मयसोबत काम करण्याची असलेली उत्सुकता दिसुन येते. यासंदर्भात सोनालीला विचारले असता ती म्हणते, हो मला चिन्मय सोबत काम करायचे आहे. आणि वर्क इन प्रोग्रेसही आहे. तर मग आपणही सोनालीची इच्छा पुर्ण होईल अशी आशा करु. आणि एका नव्या जोडीच्या चित्रपटाची वाट पाहु.