'द मुक्ता बर्वे शो'च्या माध्यमातून मुक्ता घेणार स्त्री मनाचा शोध,रेडियोजॉकीच्या रुपात साधणार महिलांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 15:19 IST
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू... एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा दिवस साजरा कर तू...म्हणत अभिनेत्री मुक्ता बर्वे घेणार आहे स्त्री ...
'द मुक्ता बर्वे शो'च्या माध्यमातून मुक्ता घेणार स्त्री मनाचा शोध,रेडियोजॉकीच्या रुपात साधणार महिलांशी संवाद
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू... एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा दिवस साजरा कर तू...म्हणत अभिनेत्री मुक्ता बर्वे घेणार आहे स्त्री मनाचा शोध, एकीकाळी पुरुषांचं क्षेत्र असं ज्याचा आजवर उल्लेख केला जायचा त्या निर्मिती क्षेत्रातही निर्माती बनून तिने आपली एक वेगळी वाटचाल सुरू केली अभिनेत्री म्हणून नाव कमावल्यानंतर आता एक निर्माती म्हणूनही तिने आपले स्थान निर्माण केले आहे. आता ती थेट स्त्री यांच्या भावना समजून घेण्यासाठी सज्ज झालीय. आजच्या स्त्रीच्या संकल्पना, विचार तसेच त्यांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ‘द मुक्ता बर्वे शो’ या कार्यक्रमांतर्गत मुक्ता उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यत अभिनयात विशेष वेगळेपण जपणारी मुक्ता आता रेडियोजॉकीच्या रुपात तिच्या चाहत्यांसमोर येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुक्ता महिलांशी संवादही साधणार आहे. बदलत्या समाज आणि परिस्थितीनुरूप 'स्त्री' ची व्याख्या देखील बदलत गेली, कालांतराने आधुनिक युगात 'स्त्री' या शब्दाचा अर्थदेखील विकसित झाला. आजची ही स्त्री बहुगुणी आहे, चूल आणि मुल यांसोबतच तिच्या विश्वात अनेक गोष्टींचा समावेश झाला आहे. तिच्या याच विश्वाचा वेध लवकरच माय एफएमच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. मराठीच्या स्टार अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.त्यामुळे स्त्रीच्या मानसिकतेचा अचूक वेध घेण्यास सज्ज असलेली मुक्ता या कार्यक्रमात काय कमाल दाखवते हे पाहणे रंजक ठरणार असून हा कार्यक्रम स्त्री विकासावर आधारित असणार आहे.