Join us

"माझ्या कुटुंबीयांबरोबर...", सोनाली कुलकर्णी अद्याप वेबसीरिजमध्ये न दिसण्यामागचं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 16:08 IST

बऱ्याच मराठी कलाकारांनी डिजिटल माध्यमात पदार्पण केले आहे. मात्र अद्याप सोनालीने या माध्यमात काम केलेले नाही.

सध्या कलाकार मंडळी चित्रपट, मालिका आणि नाटकाव्यतिरिक्त डिजिटल माध्यमांकडे वळताना दिसत आहे. यात बॉलिवूडसह मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांचाही समावेश आहे. मात्र अद्याप अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) कोणत्या वेबसीरिजमध्ये काम करताना दिसलेली नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांना या मागचं कारण जाणून घ्यायचे आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत तिने वेबसीरिजमध्ये अद्याप का झळकली नाही, याबाबतचा खुलासा केला. 

सोनाली कुलकर्णी सांगते की, वेबसीरिजमध्ये जर एखादी चांगली भूमिका मिळाली तर मी ती नक्कीच करेन. माझ्या कुटुंबांसोबत बसून जे पाहू शकेन अशा कलाकृतीत काम करायचे असे मी आधीपासूनच ठरवले आहे आणि हे तत्त्व मी करिअरच्या सुरुवातीपासूनच पाळले आहे. आजपर्यंत मला चांगल्या भूमिका मिळत आल्या आणि इथून पुढेही वेगळे काम करण्याकडे माझा कल असेल.

वर्कफ्रंटबद्दल

'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने साकारलेली बकुळा प्रेक्षकांना खूपच भावली होती. या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. सोनालीनं आतापर्यंत अनेक सिनेमांत काम केलं आहे. त्यात गाढवाचं लग्न, गोष्ट लग्नाची, नटरंग, अजिंठा, झपाटलेला २, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, ,पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, हिरकणी, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. अभिनयाबरोबच सोनाली उद्योजिका देखील झाली आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी