Join us

"लॉस्ट अँड फाऊंड" बोर्ड समोर स्पृहा ला दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 13:29 IST

'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकातील मंडळींच्या बाबतीत सिंगापूरमध्ये वेगळंच काहीतरी घडलं. नक्की घडलं काय ते आम्ही तुम्हांला सांगतो.सिंगापूरमध्ये ...

'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकातील मंडळींच्या बाबतीत सिंगापूरमध्ये वेगळंच काहीतरी घडलं. नक्की घडलं काय ते आम्ही तुम्हांला सांगतो.

सिंगापूरमध्ये 'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकाचा प्रयोग होता. त्यावेळी स्पृहा जोशी, उमेश कामत, मिहिर राजदा, निर्माते नंदू कदम यांना सिंगापूर विमानतळावर पोहचल्यावर कळले की जेट एअर वेजच्या चुकीमुळे त्यांचे लगेज मुंबई विमानतळावरच राहिले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिंगापूर विमानतळावरील एका विभागात तक्रार केली आणि तक्रारीनंतर लगेज च्या सुरक्षिततेची खात्री पटली.      

पण आम्ही तुम्हांला सांगितले की त्यांच्या बाबतीत वेगळं घडलं ते म्हणजे त्यांनी ज्या विभागात तक्रार केली त्या विभागाचं नाव होतं "लॉस्ट अँड फाऊंड". "लॉस्ट अँड फाऊंड" नावावरुन तुम्हांला पण काहीतरी सुचलं असेल ना?

"लॉस्ट अँड फाऊंड" हे स्पृहाच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. म्हणजे हे सगळं कसं मजेशीर जुळून आलं ना?

ह्या सर्व प्रकारात 'डोण्ट वरी बी हॅप्पी'  म्हणत सिंगापूर मधील नाटकाचा प्रयोग यशस्वी पार पडला. यावेळी उमेश कामत आणि मिहिर राजदा यांनी सिंगापूर विमानतळावरील "लॉस्ट अँड फाऊंड" विभागाच्या बोर्ड समोर स्पृहा ला "लॉस्ट अँड फाऊंड" सिनेमासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या. 

स्पृहाचं 'डोण्ट वरी बी हॅप्पी'  नाटक  आणि "लॉस्ट अँड फाऊंड" चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. "लॉस्ट अँड फाऊंड" २९ जुलै ला प्रदर्शित होणार आहे. स्पृहाला नाटकासाठी आणि चित्रपटासाठी खूप खपू शुभेच्छा!