Join us

सैराटच्या तेलुगू रिमेकमध्येही रिंकू साकारणार आर्ची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 13:57 IST

सैराट चित्रपटाच्या शुटींगनंतर प्रथमच टीम सैराट हैदराबाद येथे आली होती. त्यावेळी तेलुगूतील सैराट चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणार का, या ...

हैदराबादमध्ये सैराट चित्रपटाच्या प्रिमियर शोचे आयोजन केले होते. त्यासाठी टीम सैराट महाराष्ट्रातून हैदराबाद येथे आली होती. त्यावेळी सैराट चित्रपटाचा तेलुगू रिमेक मी स्वत: करत असल्याचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले. झी प्रोडक्शन आणि रॉकलाईन व्यंकटेश यांच्यासह तेलुगूतील सैराटचा रिमेक बनविण्यात येत आहे. मात्र, यातील कलाकारांबाबत सध्या काहीच ठरले नसल्याचेही नागराज म्हणाले. याबाबत आर्चीला विचारले असता नागराज सरांनी संधी दिल्यास मला तेलुगूतही आर्चीची भूमिका करायला आनंदच होईल, मी करेल असे रिंकूने म्हटले. तसेच यावेळी  आपल्या प्रेरणा, रिंकू आणि आर्ची नावाचे गुपीतही मीडियासमोर तिने  उलगडले.  तसेच हैदराबादेतील शुटींगच्या गंमती-जमतीही रिंकूने सांगितल्या. सुरुवातीला आम्हाला हैदराबादेत कुणीही ओळखत नव्हते, मात्र आता येथील मराठी आणि तेलुगू लोकांचे प्रेम पाहून खूप आनंद होत असल्याचेही आर्ची म्हणाली.