Join us

का सोडणार अमृता पत्की आपला देश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 17:44 IST

मिस अर्थ अमृता पत्कीने सत्य सावित्री सत्यवान या मराठी चित्रपटात काम केले होते. आता ती पुन्हा एकदा कौल मनाचा ...

मिस अर्थ अमृता पत्कीने सत्य सावित्री सत्यवान या मराठी चित्रपटात काम केले होते. आता ती पुन्हा एकदा कौल मनाचा या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाबाबत आणि तिच्या पुढच्या प्रवासाबाबत तिने लोकमत सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...कौल मनाचा हा चित्रपट स्वीकारण्यामागे काही कारण होते का?कौल मनाचा हा चित्रपट मी करायचा ठरवले त्यावेळी ना मी त्या चित्रपटाची कथा ऐकली होती ना चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा. या चित्रपटाचे निर्माते राजेश पाटील हे अतिशय जुने मेकअपमन आहेत. ते गेली 30-40 वर्षं इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या कष्टातून कमवलेल्या पैशातून एखादा चित्रपट करण्याचे ठरवले. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याने चित्रपटाचा विषयही न ऐकता मी हा चित्रपट करण्यास होकार दिला.आज तुला एक प्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळखले जाते. तुझ्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली?मला लहानपणापासूनच  नृत्यात आणि अभिनयात अधिक रस होता. त्यामुळे नेहमीच माझ्या घरातल्यांनी मला यासाठी प्रोत्साहन दिले. मी कॉलेजमध्ये असताना मॉडलिंग करत असे. त्यावेळी कॉलेजमधील एका फॅशन शोच्यावेळी मला एका कोरिओग्राफरने पाहिले आणि मला मिस मुंबईत भाग घेण्याचे सुचवले. त्यानंतर मी अनेक स्पर्धा जिंकत गेले. तू अभिनेत्री असण्यासोबतच एक पायलेटदेखील आहेस, हा कोर्स करावा असा विचार तू केव्हा केलास?मला नेहमीच नवीन काहीतरी करायला आवडते. स्काय डायव्हिंग तर माझे पॅशन आहे. एकदा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना मला या कोर्सविषयी कळाले आणि मी हा कोर्स करण्याचे ठरवले. मला आता विमान चालवता येते. सगळ्यात पहिल्यांदा मी विमान चालवले, त्यावेळी मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तू भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहेस, हे खरे आहे का?हो, मी आता सिंगापूरमध्ये सेटल होणार आहे. तिथे फॅशन एक्सपर्ट म्हणून काम करण्याचा माझा विचार आहे. पण सिंगापूरला गेल्यानंतर मी चित्रपटात, मालिकेत काम करणे सोडणार नाही. मी महिन्यातील काही दिवस तरी भारतात येऊन काम करणार आहे. खरे तर मला फिरायला खूप आवडते. पैसा, प्रसिद्धी यांच्यामागे धावण्यापेक्षा प्रत्येकाने आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजेत असे माझे म्हणणे आहे. त्यामुळे आता मी कामासोबतच आयुष्य एन्जॉय करण्याचा विचार केला आहे.