Join us

मिक्ता पुरस्कार सोहळा का बंद केला? महेश मांजरेकर म्हणाले- "मी काय पिकनिक नाही काढलीये..."

By देवेंद्र जाधव | Updated: May 6, 2025 17:42 IST

महेश मांजरेकर यांनी मिक्ता पुरस्कार सोहळा अचानक का बंद केला? याचा खुलासा केला आहे. काय म्हणाले मांजरेकर, जाणून घ्या (mahesh manjrekar)

महेश मांजरेकर (mahesh manjrekar) हे मनोरंजन विश्वातील लोकपर्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत. महेश मांजरेकर यांना आपण विविध सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय. महेश मांजरेकर यांनी मराठी-हिंदी सिनेसृष्टीत सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलं. महेश मांजरेकर हे काही वर्षांपूर्वी मिक्ता पुरस्कार (micta award) सोहळ्याचं आयोजन करायचे. हा पुरस्कार सोहळा परदेशात शानदार पद्धतीने पार पडायचा. महेश यांनी हा पुरस्कार सोहळा करणं बंद का केलं, याचा खुलासा केलाय. 

महेश मांजरेकर यांनी मिक्ता का बंद केलं?

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी खुलासा केला की,  "जेव्हा मी मिक्ता करायचो तेव्हा आम्हाला घेऊन जात नाही, असं कोणीतरी म्हणायचं. म्हणजे, मी काय पिकनिक नाही काढलीये. धर्मादाय नाही काढलाय. तो पुरस्कार सोहळा आहे. त्यात कोणाला नॉमिनेशन द्यायचं हे मी ठरवत नाही. नॉमिनेटेड आहेत त्यांना मी घेऊन जातो. आता काही कलाकारांनी वर्षभर कोणताही पिक्चर केला नाही. तुमचा काय मान आहे का की, लॉलीपॉप घे आणि मी तुम्हाला नेतो."

"जेव्हा मी ५०० लोकांना खूश करत असतो ना तेव्हा मी ५००० लोकांना नाखूश करत असतो. ज्यांना वाटतं हे आम्हाला नेत नाहीत, तर असं काही नाहीये. त्या ५०० लोकांना मला एवढंच सांगायचंय की, माझी तुमच्याशी काही दुश्मनी नाही किंवा ५०० लोकांशी माझं काही चांगलं नाही. जे नॉमिनेटेड आहेत आणि ते काहीतरी करतात म्हणून मी त्यांना घेऊन जातो. तुम्ही नॉमिनेटेड झालात की तुम्हाला नेईल. म्हणून शेवटी मी मिक्ता बंद केलं. खूप पैसे वाया घालवले. "

टॅग्स :महेश मांजरेकर मराठी अभिनेतामराठी चित्रपट