छायाला का आवडायचे नाही स्वत:चे नाव ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 13:20 IST
प्रत्येक व्यक्तीला आपले नाव हे कसेही असले तरी आवडतेच. कारण आपण आपल्या नावावरुनच सगळीकडे ओळखले जातो. परंतू काही लोक ...
छायाला का आवडायचे नाही स्वत:चे नाव ?
प्रत्येक व्यक्तीला आपले नाव हे कसेही असले तरी आवडतेच. कारण आपण आपल्या नावावरुनच सगळीकडे ओळखले जातो. परंतू काही लोक असे असतात कि त्यांना स्वत:च्याच नावाचा तिटकारा असतो. आपले असे नाव का ठेवले असेल या विचारात ते संपूर्ण आयुष्य काढतात. पण जर त्याच नावाने तुम्हाला सर्व जग ओळखु लागले आणि ते नावच जर तुमची सशक्त ओळख झाली तर नक्कीच तुम्हाला आवडेल ना. आता हेच पाहा की, सैराटमधील अक्का म्हणून सगळीकडे फेमस झालेल्या अभिनेत्री छाया कदम यांना त्यांचेच नाव आवडायचे नाही. आज छाया कदम हे नाव घराघरात पोहचले आहे. परंतू पुर्वी आपल्याच नावाची चिड छायाला यायची. याचे कारण म्हणजे तिला लहानपाणापासूनच सगळे छायड्या म्हणायचे मग आपले असे कसे नाव म्हणुन तिला फारच राग यायचा. परंतू आता ज्या नावाने आपल्याला खरी ओळख मिळवून दिली तेच नाव आता छायाला आवडू लागले आहे. सैराट या चित्रपटाने जरी आर्ची-परशा ही जोडी फेमस झाली असली तरी आता छाया कदम हे नाव देखील लोकांच्या लक्षात आहे. सैराटमधील त्यांचा अभिनय उल्लेखनीयच होता. या चित्रपटानंतर सैराटमधील अक्कांना छाया कदम अशी ओळख मिळआली अन आता त्या सगळीकडेच दिसू लागल्या. बºयाच चित्रपटांत दमदार भूमिका साकारलेल्या छाया कदम यांचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. चित्रपटसृष्टीत तर आता छाया कदम हे नाव आदबीने घेतले जाते. ज्या नावाचा छायाला राग यायचा आज तेच नाव फिल्म इंडस्ट्रीत मानाने घेतले जाते. यापेक्षा दुसरा आनंद छायासाठी काय असणार.