Join us
Daily Top 2Weekly Top 5

सई वेब शोच्या सुरुवातीलाच का निघुन गेली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 09:46 IST

“टिक टिक वाजते डोक्यात...” हे जरी गाणं असलं ना तरी या मागच्या भावना कधी फुलून येतील सांगता येत नाही. आता टिक टिक वाजतेय अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांच्या डोक्यात, यामागचं कारणही तसंच आहे म्हणा.

“टिक टिक वाजते डोक्यात...” हे जरी गाणं असलं ना तरी या मागच्या भावना कधी फुलून येतील सांगता येत नाही. आता टिक टिक वाजतेय अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांच्या डोक्यात, यामागचं कारणही तसंच आहे म्हणा. ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या वेब सिरीजच्या ७ व्या वेब एपिसोडमध्ये सुंदरा सई ताम्हणकर आली आहे. सई आल्यावर अनेक दिलों की धडकन बढती है, मग आता अमेय आणि निपुणचं काय होणार?

सई म्हणजे काय फक्त कमी कपड्यात वावरणारी आहे का? असं सई अमेय आणि निपुणला का सांगते. अमेय आणि निपुणच्या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री शेवटी निघून जातात पण आज सई सुरुवातीलाच निघून गेली. असं का झालं असेल?

खरंच सईचं बोलणं या दोघांना महागात पडेल का? नक्की काय झालं हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’चा ७ वेब एपिसोड-