वोग ब्यूटी अवॉर्ड्ससाठी हजर असलेली राधिका म्हणाली, '' मला 'कबाली'च्या प्रमोशनमध्ये जाता आलं नाही याचे वाईट वाटते. सध्या मी 'घौल' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये गुंतली आहे. यातून मला वेळच काढता आला नाही.'''कबाली'ने भारतात केवळ पाच दिवसात २५० कोटी रुपये कमाईचा आकडा पार केला आहे. परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.'कबाली'च्या यशाबद्दल राधिका म्हणाली,'' मला वाटते चित्रपट सर्व विक्रम मोडीत काढेल. रजनीकांतसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या अनुभवापैकी तो एक होता.''
'कबाली'च्या प्रमोशनमध्ये का नव्हती राधिका आपटे ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 14:25 IST