Join us

​का गेला जितेंद्र जोशी ब्रेकवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 13:07 IST

आजच्या जगात सोशल मीडिया ही प्रत्येकासाठी गरजेची गोष्ट बनली आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप सारख्या सोशल मीडियाच्या साधनांशिवाय ...

आजच्या जगात सोशल मीडिया ही प्रत्येकासाठी गरजेची गोष्ट बनली आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप सारख्या सोशल मीडियाच्या साधनांशिवाय लोक आपल्या आयुष्याचा विचार देखील करू शकत नाही. बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार यांच्यासाठी तर आपल्या चाह्यांसोबत थेट संवाद साधण्यासाठी एक हक्काचे व्यसापीठ बनले आहे. त्यामुळे अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. जितेंद्र जोशी नेहमीच आपल्या फेसबुक आणि ट्विटरवर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. पण काही दिवसांसाठी सोशल मीडियावरून त्याने ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. त्यानेच पोस्ट करून याबाबत त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याने फेसबुक आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यात म्हटले आहे की, फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपला काही दिवसांची सुट्टी... आपण लवकरच भेटूया.जितेंद्रने ही पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यापासून जितेंद्रने सोशल मीडियातून ब्रेक का घेतला आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. जितेंद्र का सुट्टीवर गेला असेल याचे तर्कवितर्क देखील ते लावत आहे. एवढेच नव्हे तर जितेंद्र प्रमाणेच इतरांनी देखील सोशल मीडियातून काही दिवसांचा तरी ब्रेक घेतला पाहिजे असे त्याच्या काही चाहत्यांचे म्हणणे आहे. जितेंद्रच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करत असून जितेंद्रने सोशल मीडियावरून ब्रेक का घेतला असेल त्याबद्दल स्वतःची मते व्यक्त करत आहेत.आता प्रेक्षकांचा लाडका जितू सोशल मीडियावरील या ब्रेकवरून परत कधी येतो आणि आपल्या चाहत्यांशी पुन्हा केव्हा संवाद साधतो हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. Also Read : ​सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशीची जमली जोडी