Join us

कोण पटकावणार या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 14:05 IST

पहिल्या मराठी फिल्मफेअर पुरस्काराला मिळालेल्या प्रचंड यशानंतर. याही वर्षी ही पंरपरा कायम राहणार आहे. यावर्षी या पुरस्कारच्या अनावरणाच्या उद्धाटन ...

पहिल्या मराठी फिल्मफेअर पुरस्काराला मिळालेल्या प्रचंड यशानंतर. याही वर्षी ही पंरपरा कायम राहणार आहे. यावर्षी या पुरस्कारच्या अनावरणाच्या उद्धाटन अभिनेत्री सई ताम्हणकरच्या हस्ते झाले. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयदेखील यावेळी उपस्थितीत होता.     फिल्मफेअरविषयी सई ताम्हणकर सांगते की, ‘‘हा पुरस्कार मिळवणे हे इंडस्ट्रीतील प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या मेहनतीसाठी प्रतिष्ठेचा हा  पुरस्कार मिळवणे ही मानाची गोष्ट मानली जाते. मराठी फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्समधून संपूर्ण चित्रपटसृष्टीतीला एकाच व्यासपीठावर पुढे आणणे ही अत्यंत उत्साहाची गोष्ट असल्याचे सईने म्हटले आहे.             २१ मार्च १९५३ साली स्थापना झालेले फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डही भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठेच्या अॅवॉर्ड मानला जातो. फक्त पाच पुरस्कार असलेल्या एका छोट्या कार्यक्रमापासून फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली आणि आज हा भारतातील सर्वात दिमाखदार सोहळ्यापैकी एक झाला आहे. जिथे भारतीय सिनेमातील सर्वोत्तम कलाकार आपली कला सादर करतात, निवेदन करतात. प्रत्येक चित्रपटातील कलाकाराला या पुरस्काराची भुरळ पडल्यापासून राहत नाही.             हा सोहळा २७ नोव्हेंबर २०१६ ला फिल्मसिटी येथे होणार आहे़. या प्रतिष्ठित पुरस्काराद्वारे मराठी चित्रपट सृष्टीतील काही सर्वोत्तम कलाकारांचा सम्मान केला जाणार आहे, ज्यांनी या वर्षात मराठीतील काही सर्वोत्तम चित्रपट देऊन स्वत:चा ठसा उमटवला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रदर्शन कलर्स मराठीवर २५ डिसेंबर २०१६ रोजी केले जाणार आहे.