प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कलर्स वाहिनी वेगवेगळ्या विषयावर आधारित मालिका घेऊन येत आहेत. आता मालिकेसह कलर्स मराठी रिएलिटी शो खास प्रेक्षकांसाठी लवकरच आणणार आहेत.
सुखाचा शुभारंभ होणार आणि आता स्वप्न पूर्ण होणार असं सांगत ‘कोण होईल मराठी करोडपती’ या शोची जाहिर सूचना नुकतीच कलर्स मराठीने केली.
ई-टि.व्ही. मराठी वर ‘कोण होणार मराठी करोडपती’ हा रिएलिटी शो प्रसारित होत होता. तेव्हा अभिनेते सचिन खेडेकर या शोचे होस्ट होते. आता परत कलर्स मराठीवर ‘कोण होणार मराठी करोडपती’चा नवीन पर्व लवकरच सुरु करणार आहे. यावेळच्या शोचे होस्टिंग कोण करणार हे लवकरच कळेल.
तोपर्यंत प्रतिक्षा करुयात. पाहा ‘कोण होईल मराठी करोडपती’ शोची छोटीशी झलक-