Join us

कुशल-संतोष कोणाला भेटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 14:04 IST

          अभिनेता कुशल बद्रिके आणि संतोष जुवेकर मराठी इंडस्ट्रीतील एका तगड्या कलाकाराला नुकतेच भेटले आहेत. ...

          अभिनेता कुशल बद्रिके आणि संतोष जुवेकर मराठी इंडस्ट्रीतील एका तगड्या कलाकाराला नुकतेच भेटले आहेत. अहो फक्त भेटले नाहीत तर या दोघांनी त्या कलाकाराकडे चक्क काम मागितले आहे. आता तुम्ही म्हणाल कि कुशल आणि संतोषवर काम मागायची वेळ का आली. आणि ते पण इंडस्ट्रीतील एका भारदस्त  व्यक्तीकडे हे दोघेही काम मागण्यासाठी गेले होते. पण या दोघांवर खरेखुरे काम मागण्याची वेळ आली नाही तर त्यांना स्ट्रगलर साला या शोसाठी दस्तुरखुद्द महेश मांजरेकर यांच्याकडे काम मागण्यासाठी जावे लागले आहे. नुकतेच स्ट्रगरल साला या बेव सिरीजच्या आठव्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना अभिनेते महेश मांजरेकर यांचे दर्शन झाले आहे. स्ट्रगलर साला या वेब सिरिजचे काही एपिसोड झाल्यानंतर अचानक या टिमने एक ब्रेक घेतला होता. नेटिझन्सच्या पसंतीस हे स्ट्रगलर्स उतरले होते. पण अचानक ही वेब सिरिज बंद पडल्याने प्रेक्षक या स्टगलर्सच्या प्रतिक्षेत होते. आता हे दोघेही एकदम नव्या दमाने आणि अफलातुन अंदाजात ही वेब सिरिज घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच या स्ट्रगलर्सचा महेश मांजरेकर यांच्यासोबतचा एक एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळाला. संतोष आणि कुशल हे दोघेही स्ट्रगलर त्यांचे नशीब आजमाविण्यासाठी नेहमीच कोणत्या ना कोणत्या दिग्दर्शकांकडे जात असतात. आता तर त्यांनी थेट महेश मांजरेकर यांनाच गाठले होते. मांजरेकरांनी या दोघांना काम दिले का? या स्ट्रगलर्सचे पुढे काय झाले याची उत्सुकता तर नक्कीच त्यांच्या चाहत्यांना लागली असणार. महेश मांजरेकर यांच्या समोर उभे राहुन काम मागणे म्हणजे खरंच सोपे नाही. पण स्ट्रगलर्सचा अंदाज जर मांजरेकरांना आवडला तर आपल्याला नक्कीच हे दोघे त्यांच्या आगामी सिनेमात दिसुही शकतील.