तेजश्री प्रधाननंतर शशांकच्या आयुष्यात आलेली'ती'कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 17:45 IST
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी शशांक ...
तेजश्री प्रधाननंतर शशांकच्या आयुष्यात आलेली'ती'कोण?
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी शशांक त्याच्या मालिकेमुळे चर्चेत आलेला नसून पुन्हा एकदा तो त्याच्या खासगी आयुष्यातील एका खास घटनेमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी शशांकने त्याच्या फेसबुक पेजवर एक प्रोफाईल फोटो ठेवला आहे. विशेष म्हणजे या फोटोत शशांकसह एक मुलगीही दिसतेय. जसा शशांकने हा फोटो फेसबुकवर अपलोड केला काही क्षणांतच त्याच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. मात्र काही चाहत्यांनी थेट त्याला वेगेवगळे प्रश्न विचारत भांबावून सोडले. मात्र शशांकने या प्रश्नांना उत्तर देणे टाळले असले तरीही शशांकसह दिसणारी ती मुलगी कोण? असा प्रश्न चाहत्यांना सतावत असल्यामुळे जिथे जाल तिथे शशांकच्या या मैत्रिणीची चर्चा होताना दिसतेय.इतकेच नाहीतर चाहत्यांच्या कमेंटस आणि लाईक्सबरोबर मराठी सेलिब्रेटीही या फोटोला कमेंट आणि लाईक्स करताना दिसतायेत. या फोटोमुळे शशांक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. शशांकसह फोटोत दिसणारी त्या तरूणीचे प्रियांका ढवळे असे नाव असून ती डोंबिवलीची रहिवासी असल्याचे कळतंय. फक्त शशांकनेच हा फोटो फेसबुकवर शेअर केलेला नाही तर प्रियंकाने देखील तिच्या फेसबुकवर हा फोटो शेअर केला आहे.'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्री-जान्हवी अर्थातच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान सगळ्यात रोमँटीक जोडी म्हणून ओळखली जात होती.प्रेम असावे तर श्री-जान्हवी यांच्या प्रेमाप्रमाणेच प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जायच्या.शशांक आणि तेजश्रीचं पुण्यात 8 फेब्रुवारी 2014ला लग्न झाले होते.त्यावेळी 'होणार सून मी या घरची' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.रसिकांकडून मिळणा-या भरघोस पसंतीमुळे ही मालिका टीआरपी रेटींगमध्ये मराठीतील नंबर 1 मालिका ठरली होती. मालिकेत ही जोडी झळकत असल्यामुळे त्यांच्या रिअल आयुष्यात होणा-या लग्नाचीही विशेष चर्चा झाली होती. मालिकेत दोघांनी परफेक्ट कपल रंगवल्यामुळे रसिकांनाही ही जोडी रिलप्रमाणे रिअल आयुष्यातही कपल बनत संसार थाटावा अशी इच्छा व्यक्त करायचे.त्याचप्रमाणे दोघांचे लग्नही झाले.वर्षभरातच त्यांच्या खर्या आयुष्यात दुरावा निर्माण झाला. पडद्यावर रिल आयुष्यातील घडामोंडींप्रमाणेच रिअल आयुष्यातील घडामोडी घडु लागल्या होत्या.मालिकेमध्येही त्यांच्यात दुरावा आल्याचे कथानक सुरू होते. ते दोघे घटस्फोटाचा दावा दाखल करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे मालिकेत दाखवण्यात येत होते. त्यामुळे त्यांच्या खर्या आयुष्यातील दुरावा हा कदाचित प्रसिद्धीचा स्टंट असावा, अशी मालिकेच्या प्रेक्षकांची समजूत झाली होती; मात्र हा स्टंट नसून त्यांच्यात एका वर्षातच खरंच कटुता निर्माण झाल्याचे समोर आले.हे लग्न पुण्यात झाल्यामुळे घटस्फोटासाठीचा अर्ज पुण्यातील फॅमिली कोर्टात दाखल करण्यात आला होता. मात्र काही दिवसांनंतर या गोड जोडीने एकमेकांपासून विभक्त होत घटस्फोटही फाइल केला.अजूनही कायद्यानुसार या दोघांचा घटस्फोट झालेला नाहीय. आता दोघांचेही मार्ग वेगवेगळे झाले असून दोघेही आपापल्या आयुष्यात रमले आहेत.मात्र शशांकच्या त्या खास फोटोमुळे पुन्हा एकदा शशांक बोहल्यावर चढणार असल्याचे बोलले जात आहे.