Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजाने होणाऱ्या नवऱ्याची खबर सर्वात आधी कोणाला दिली? म्हणाली, "वैभव, भूषण नाही तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 17:28 IST

Pooja Sawant : पूजा सावंतने होणाऱ्या नवऱ्याबद्दल तिच्या मित्र मंडळींमध्ये सुरुवातीला एका व्यक्तीला सांगितले होते. ती व्यक्ती कोण आहे आणि इतर मित्र मैत्रिणींना सांगितल्यावर त्यांची रिएक्शन काय होती, याबाबतचा खुलासा पूजाने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) नुकतेच चाहत्यांना साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. समुद्र किनाऱ्यावरील रोमँटिक फोटो शेअर करत तिने ही खुशखबर दिली होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण आहे. दरम्यान आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिने सिद्धेश चव्हाण आणि तिच्या होणाऱ्या सासूबाई आणि लग्नाबद्दल सांगितले आहे. तिचे लग्न ठरले, याबद्दल मित्र मंडळींमध्ये वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधान यांच्याआधी एका खास व्यक्तीला सांगितले होते. ही व्यक्ती म्हणजे गौरी महाजनी. गौरी महाजनी अभिनेता गश्मीर महाजनीची पत्नी आहे आणि ती पूजा सावंतची खास मैत्रीण आहे.

पूजा सावंतने होणाऱ्या नवऱ्याबद्दल तिच्या मित्र मंडळींमध्ये सुरुवातीला एका व्यक्तीला सांगितले होते. ती व्यक्ती कोण आहे आणि इतर मित्र मैत्रिणींना सांगितल्यावर त्यांची रिएक्शन काय होती, याबाबतचा खुलासा पूजाने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ती  म्हणाली, अनेक दिवस मी सिद्धेशच्या संपर्कात होते पण आमच्या नात्याबद्दल आणि लग्न करणार असल्याचे सर्वप्रथम मी गौरी महाजनीला सांगितले होते. गौरी म्हणजे गश्मीर महाजनीची पत्नी. ती माझी अनेक वर्षांपासून घट्ट मैत्रीण आहे. त्यामुळे सिद्धेशबद्दल मी सर्वात आधी तिला सांगितले. भूषण-वैभवला सुरूवातीला काहीच माहिती नव्हते.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, सोशल मीडियावर मी जेव्हा फोटो शेअर केले त्याच्या एक महिनाआधी मी या नात्याबद्दल भूषण-वैभवला सांगितले. त्यांना काहीच माहीत नसल्यामुळे सिद्धेशबद्दल ऐकल्यावर ते दोघेही शॉक झाले होते. कारण, माझ्या आयुष्यात एवढ्या गोष्टी घडत आहेत याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. आता माझे सगळे मित्र सिद्धेशला भेटलेत. ते सगळेजण माझ्यासाठी खूप आनंदी आहेत. कारण, मला लग्न करण्याची इच्छा आहे हे या सगळ्यांना माहित होते. भूषण, वैभव, गश्मीर, अभी, प्रार्थना, गौरी हे माझे मित्र माझ्यापेक्षा जास्त माझ्या लग्नासाठी उत्सुक आहेत.पूजा सावंत पुढच्या वर्षी सिद्धेश चव्हाणसोबत लग्न करणार आहे.

टॅग्स :पूजा सावंतवैभव तत्ववादीभुषण प्रधान