Join us

​स्पृहा कोणासाठी तळतेय वडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 14:00 IST

       अभिनेत्री स्पृहा जोशीने नेहमीच तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. स्पृहाला आपण सतत ...

       अभिनेत्री स्पृहा जोशीने नेहमीच तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. स्पृहाला आपण सतत रंगमच, मालिका आणि चित्रपटातून विविध भूमिकांमधुन पाहिलेच होते. परंतु स्पृहा उत्तम कुक असल्याचे तुम्हाला माहित आहे का? होय..अभिनेत्री स्पृहा जोशी मस्त मसालेदार, खमंग पदार्थ झक्कास बनवत असल्याचे समजले आहे. अहो हे आम्ही फक्त सांगत नाही तर नुकतेच तिचे पाक कौशल्य सर्वांच्या समोर आले आहे. स्पृहाने सोशल साईट्सवर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये स्पृहा खमंग वडे तळत असल्याचे दिसत आहे. गरमा गरम वडे खाण्याची मजाच काही और असते. पण ते वडे तळण्यातही आनंद दडलेला असतो हे स्पृहाच्या फोटोकडे पाहून नक्कीच समजु शकते. अहो एवढेच नाही तर कुकिंग करताना स्पृहाला एकदम रिलॅक्स वाटते आणि मेडिटेशन केल्यासारखे भासते असेच ती सांगत आहे. या फोटोला तिने एक कॅप्शन दिली आहे. कुकिंग इज लाईक मेडिटेशन, रिलॅक्स... असे तिने या फोटोसाठी लिहिले आहे. खरंच आहे म्हणा, या कलाकारांना त्यांच्या व्यस्त शेड्युल्डमुळे स्वत:साठी फारसा वेळ मिळत नाही. सतत लाईट कॅमेºयाच्या झगमगाटात वावरताना आपल्या आवडीच्या गोष्टी करायलाही त्यांना मिळत नाहीत. मग स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक बनविणे तर लांबची गोष्ट. पण तरीही एखाही सुटटी मिळाली तर हे कलाकार आपला संपुर्ण वेळ फॅमिली आणि फ्रेन्ड्स सोबत घालवून एंजॉय करतात. आता स्पृहाचेच पाहा ना, तिने सुट्टीच्या दिवशी चटकदार वडे घरी बनवण्याचा आनंद घेतला. त्यामुळे तुम्हाला जर असे वाटत असेल कि सेलिब्रिटीजना काय स्वयंपाक करता येणार. तर असा गैरसमज आता करुन घेऊ नका.