कोणते दोन नाटक करणार खारेपाट नाटकांचा दौरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 12:56 IST
सध्या खारेपाट महोत्सवच्या प्रेमात प्रेक्षकांचे लाडके कलाकार पडलेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्मिता गोंदकर, भाऊ कदम, श्रेया बुगडे असे ...
कोणते दोन नाटक करणार खारेपाट नाटकांचा दौरा?
सध्या खारेपाट महोत्सवच्या प्रेमात प्रेक्षकांचे लाडके कलाकार पडलेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्मिता गोंदकर, भाऊ कदम, श्रेया बुगडे असे अनेक कलाकार या महोत्सवाचा आनंद घेणार असल्याचे समजले होते. आता तर थेट दोन मराठी नाटकं या खारेपाट महोत्सवचा दौरा करणार असल्याचे कळत आहेत. या महोत्सवाचे विषेश म्हणजे यामध्ये १५० पेक्षा जास्त महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग, अफाट गर्दी, असंख्य स्टॉल्स आणि चविष्ट खाण्याच्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. आता हेच पाहा ना, अभिनेता भरत जाधव, चैत्राली गुप्ते, मयुरेश पेम,परी तेलंग, स्मिता गोंदकर आणि कमलाकर सातपुते कारण हे कलाकार आॅल द बेस्ट २ आणि सौजन्याची ऐशीतैशी हे नाटक सादर करणार आहेत. झेप फॉउंडेशनच्यावतीने खारेपाट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. २० ते २५ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव होणार असून, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आॅल द बेस्ट २ आणि २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सौजन्याची ऐशीतैशी या नाटकांचा आनंद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. त्याचसोबत नंदेश उमप दिग्दर्शित संगीत का मेला या बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद प्रेक्षक २२ डिसेंबर रोजी घेऊ शकणार आहेत. सौजन्याची ऐशी तैशी नाटकाच्या खारेपाट दौºयाबद्दल भारत जाधव सांगतात, खारेपाट महोत्सवाचं यंदाचं तिसरं वर्ष आहे आणि ही हॅट्रिक अजून धमाकेदार करायला सौजन्याची ऐशीतैशी नाटक खारेपाट दौरा करतंय याचा मला खूप आनंद आहे. सौजन्याची ऐशीतैशीची सर्व टीम तिकडे खूप धमाल करणार आहे.