Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरोहची कोणती इच्छा झाली पूर्ण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 17:45 IST

प्रत्येकाला लहानपणापासून काही ना काही शिकण्याची इच्छा असते. काहींची ती पूर्ण होते. तर काहींची ती इच्छा अधुरीच राहते. पण ...

प्रत्येकाला लहानपणापासून काही ना काही शिकण्याची इच्छा असते. काहींची ती पूर्ण होते. तर काहींची ती इच्छा अधुरीच राहते. पण आपली तीच इच्छा जर कामाच्या निमित्ताने पूर्ण होणार असेल तर आपल्या त्या इच्छेला चार चाँदच लागतात. अशीच एक इच्छा अभिनेता आरोह वेलणकरची पूर्ण झाली आहे. त्याच्या या इच्छेबाबत लोकमत सीएनएक्सला आरोह सांगतो, ''मला घोडेस्वारी फार आवडते. पण मी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता की, कामाच्या निमित्ताने मला घोडेस्वारी शिकण्यास मिळेल. पण एका चित्रपटाच्या निमित्ताने माझी घोडेस्वारी शिकण्याची इच्छा पूर्ण झाली. सध्या मुंबईत माझे घोडेस्वारीचे प्रशिक्षण सुरु आहे. सुरूवातीला घोड्यावर बसण्याची फार भीती वाटत होती. पण हळूहळू हा भीती दूर झाली. कारण आयुष्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता हे वाक्य आता मला पटले आहे. माझ्या या आत्मविश्वासामुळे माझ्यातील भीतीदेखील दूर झाली आहे. मी थोडी स्टाइलिश प्रकारची घोडेस्वारी शिकतो आहे.    घोडेस्वारीचे काही सीन्सचे चित्रिकरणदेखील झाले आहे. तसेच हा चित्रपट बिगबजेट आहे. तो हिंदी आहे का मराठी हे सांगणे आता योग्य नाही. काही दिवसातच प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी कळेल. आरोह यापूर्वी घंटा, रेगे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  चला तर वाट पाहुयात आरोह हा नक्की कोणत्या चित्रपटासाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत आहे