Join us

'आयुष्य तुला कुठेही घेऊन जात असले तरी...', स्वप्निल जोशीने लेकीच्या ७व्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 20:12 IST

Swapnil Joshi : स्वप्निल जोशीची मुलगी मायराचा आज सातवा वाढदिवस आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने स्वप्नीलने आपल्या या लाडक्या लेकीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्निल जोशी (swapnil joshi).उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वप्निलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. स्वप्नील जोशी सोशल मीडियावर चर्चेत असतो. अभिनयावर प्रेम करणाऱ्या स्वप्निलचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे हे त्यांच्या अनेकवेळा सोशल मीडियावरील पोस्टवरुन दिसते. स्वप्निल जोशीने त्याची लेक मायराच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

स्वप्निल जोशीची मुलगी मायराचा आज सातवा वाढदिवस आहे. मायराला अनेकदा मुलाखतीतून सोशल मीडियावरून प्रेक्षकांनी पाहिलेले आहे. आज तिच्या वाढदिवसा निमित्ताने स्वप्नीलने आपल्या या लाडक्या लेकीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. स्वप्निलने लिहिले की, प्रिय मायरा, आज खास दिवस आहे. आयुष्यातील सात वर्ष पूर्ण झाल्याचा पहिला मैलाचा दगड आहे. अगदी कालच घडले असं वाटत होतं, जेव्हा तुला पहिल्यांदा माझ्या मिठीत धरलं होतं. तुझी चिमुकली बोटं आणि नाजूक शरीरयष्टी पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. लवकरच तू तारुण्याकडे वाटचाल करत आहेस! सरणारे प्रत्येक वर्ष मौल्यवान क्षण आणि प्रेमळ आठवणींनी भरलेले आहे. तुझ्या पहिल्या पावलापासून ते मनमुराद हास्यापर्यंत, तू आमच्या जीवनात अपार आनंद आणलास! तुझ्यामुळे माझे जग प्रकाशित करून चैतन्य आणि कुतूहलाने भरून टाकले आहे. तुला शिकताना आणि वाढताना पाहणे हा माझ्यासाठी विस्मयकारक अनुभव होता. नवीन गोष्टी शोधण्याचा तुझा उत्साह आणि आव्हानांवर मात करण्याची तुझी जिद्द मला चकित करते.

त्याने पुढे लिहिले की, तुझ्याकडील दयाळूपणा आणि इतरांबद्दल सहानुभूती असलेल्या चांगुलपणाची सतत आठवण करून देते. तू तुझ्या सातव्या वर्षाची सुरुवात करताना, माझी इच्छा आहे की तू मोकळ्या हातांनी आयुष्य स्वीकारत रहा. तु नेहमी स्वतःशी इमानदार राहा, आपली आवड जोपासत आणि अटळ स्वप्नांचा पाठपुरावा कर. सर्वात साध्या गोष्टींमध्ये आनंद मिळो आणि विलक्षण गोष्टींचा पाठलाग करण्याचे धैर्य नेहमीच तुझ्यात असू दे! लक्षात ठेव की आम्ही तुझ्यावर अपार प्रेम करतो. आयुष्य तुला कुठेही घेऊन जात असले तरी, हे जाणून घे की आजी आबा, आई बाबी आणि राघव व्यतिरिक्त, नेहमी स्वामी आबाचे समर्थन, मार्गदर्शन आणि प्रेम तुझ्या पाठीशी आहे. अशीच नेहमी आनंदी रहा, तुझे जग हसू, आनंद आणि अमर्याद शक्यतांनी भरले जावो.
टॅग्स :स्वप्निल जोशी