Join us
Daily Top 2Weekly Top 5

पर्ण आणि सावनी कुठे फिरतायत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 13:39 IST

    प्रियांका लोंढे          पर्ण पेठे आणि सावनी रवींद्र या दोघी कॉलेज पासून एकमेकिंच्या मैत्रिणी ...

  
  प्रियांका लोंढे
          पर्ण पेठे आणि सावनी रवींद्र या दोघी कॉलेज पासून एकमेकिंच्या मैत्रिणी आहेत. एक चित्रपटसृष्टीची गायिका तर दुसरी अभिनेत्री. नूकताच या दोघींचा एक फोटो सोशलसाईट्सवर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पर्ण आणि सावनी दोघीही मजा मस्ती करताना दिसत आहेत. पण नक्की या दोघी कुठे फिरत आहेत या संदर्भात लोकमत सीएनएक्सने सावनीशी संवाद साधला असता ती सांगते, आम्ही दोघी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर लाँग ड्राईव्ह एंजॉय करीत होतो. पर्ण आणि मी कॉलेज पासून एकमेकिंच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. परंतू आम्हाला कामामूळे फारसे कधी भेटताच येत नाही. आमच्या दोघींचेही मुंबईत एकाच दिवशी काम असल्याने आम्ही सोबतच गाडीतून मुंबईला गेलो. यावेळी आम्हाला आमचे जुने कॉलेजचे दिवस आठवले. मग काय आम्ही पुन्हा त्या क्षणांना उजाळा देण्यासाठी हायवेवर थांबून मस्त फोटोज काढले, मजा केली. कधीतरीच असा स्पेशल वेळ आम्हाला मिळतो. म्हणूनचआम्ही दोघींनीही या लॉंग ड्राईव्हचा पुरेपूर आनंद घेतला.