Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुठे करतायेत हे कलाकार कल्ला... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 14:53 IST

लहान असो वा मोठा ट्रीप म्हटली की प्रत्येकालाच आनंद होतो. भले ती ट्रीप मग कामासंबंधी असली तर मग व्यक्तीचा ...

लहान असो वा मोठा ट्रीप म्हटली की प्रत्येकालाच आनंद होतो. भले ती ट्रीप मग कामासंबंधी असली तर मग व्यक्तीचा आनंद गगनात मावेनासा होतो. कारण कामाच्या निमित्ताने तरी आपल्याला परदेशाचे दर्शन होण्याची संधी मिळते. अशीच एक संधी मराठी कलाकारांच्या वाटेला आलेली पाहायला मिळत आहे. कारण फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियावर मराठी कलाकारांचे लंडनवारीचे फोटो पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिनेता संतोष जुवेकर, मंगेश देसाई, भाऊ कदम आणि कुशल बद्रिके पाहायला मिळत आहेत. कारण कुठे जाऊ तिथे सेल्फी काढू. असाच काहीसा नियम हल्ली लागू झाल्यासारखा दिसतो. हाच नियम कलाकारदेखील अत्यंत आनंदाने पाळताना दिसत आहे. कारण मुंबई एअरफोर्टपासून ते विमानात बसेपर्यतचे सर्व फोटो या कलाकारांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. . लंडनच्या रस्त्यांनी अभिनेता मंगेश देसाईच्या मनावर भुरळ घातलेली दिसत आहे. कारण मंगेशने खास लंडनच्या रस्त्यावर उभा राहून काढलेला फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून लाइक्स दिलेले दिसत आहेत.  नक्की हे कलाकार लंडनवारीला कशासाठी गेले आहे हे अदयापदेखील काही कळाले नाही. मात्र त्यांची ही ट्रीप भन्नाट चालू असल्याचे दिसत आहेत. या फोटोमधील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनेता भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची जोडी तर प्रेक्षकांना खळखळून हसविणारी आहे. त्यामुळे ही जोडी कलाकारांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तर अभिनेत संतोष जुवेकरदेखील अस्सं सासरं सुरेख बाई या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर तो आता बॉलिवूडमध्येदेखील झळकणार आहे.