कलाकारांना चाहत्यांपर्यत पोहोचण्यासाठी सोशलमीडिया हे एक माध्यम महत्वपूर्ण आहे. पण यात ही या सोशलमीडियाचा वापर काही कलाकार भरभरून करतात. तर काही कलाकार फार कमी अपडेट असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सोशलमीडिया फंडामध्ये प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वीना जामकरचादेखील समावेश आहे. वीनाने थेट दोन महिन्यांनी सोशलमीडियावर फोटो अपलोड केला आहे. या फोटोमधील तिची अदा, मोकळे केस, सौदर्यं पाहून तिच्या चाहते नक्कीच म्हणतील, ओफ क्या अदा है. तिची ही अदा तेजस नेहरूरकर या फोटोग्राफरने कॅमेरात कैद केली आहे. वीनाने या फोटोचे श्रेय देखील तेडजसला सोशलमीडियावर दिले आहे.
क्या अदा है
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 15:22 IST