Join us

मराठी कलाकारांना झाले काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 14:33 IST

नेहमीच शुटींगमध्ये बिझी असणारे कलाकार स्वत:साठी निवांत वेळ कधी मिळेल याची वाट पाहत असतात. तसा वेळ मिळताच त्या संधीचा ...

नेहमीच शुटींगमध्ये बिझी असणारे कलाकार स्वत:साठी निवांत वेळ कधी मिळेल याची वाट पाहत असतात. तसा वेळ मिळताच त्या संधीचा ते पुरेपुर फायदा घेतानाही दिसतात. असेच काहीसं झालंय अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे या चौघांच्या बाबतीत. लंडनमध्ये 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाच्या शुटिंगमधून वेळ मिळताच या चौघांनी फुल ऑन धमाल केली. वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारत भन्नाट फोटसेशनही करायला ही मंडळी विसरली नाहीत. तिथले बरेच फोटो त्यांनी सोशलमिडियावर शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे पोटॅटो वेजेस ओठांमध्ये पकडून मोठे दात असल्याचे दाखवत प्रेक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतांना फोटोत दिसतायेत. असे अनेक फनी फोटो त्यांनी शेअर केले आहे. त्यांची ही मस्ती पाहता, प्रत्येकजण आपल्या लहानपणीच्या आठवणीत रमणार हे मात्र नक्की.