Join us

उमेश कामत करणार काय नक्की?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 11:36 IST

आपल्या अभिनयाने अभिनेता उमेश कामत याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हा अभिनेता काही दिवसांपासून आपल्या फिटनेसवर खूपच लक्ष देत ...

आपल्या अभिनयाने अभिनेता उमेश कामत याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हा अभिनेता काही दिवसांपासून आपल्या फिटनेसवर खूपच लक्ष देत असल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र उमेश कामतच्या डोक्यात काही तरी वेगळचं शिजतयं असे दिसत आहे. कारण त्याने नुकतेच सोशलमीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर त्याने साऊंड, अ‍ॅक्शन, कॅमेरा म्हणत पोस्टदेखील शेअर केली आहे. या फोटोमध्ये तो कॅमेरासमोर न दिसता, कॅमेरा मागची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. त्यामुळे हा अभिनेता नक्की करतोय काय यांची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागली आहे. आता उमेश एका दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार का अशी कुजबूजदेखील ऐकण्यास मिळत आहे. मात्र यंदा उमेश काहीतरी हटके अंदाजात घेऊन येणार हे मात्र नक्की. चला तर उमेशच्या या सरप्राईजची थोडी वाट पाहूयात.          उमेशने यापूर्वी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. यामध्ये कायदयाचं बोला, पटल तर घ्या, टाइमप्लीज, अजब लग्नाची गजब गोष्ट, लग्न पाहावे करून, बालकडू, मुंबई टाइम अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्याने स्वामी, रणांगण, गांधी अडवा येतो यासारख्या अनेक नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सध्या त्याचे डोण्ट वरी बी हॅपी हे नाटक लोकप्रिय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या नाटकात त्याच्यासोबत अभिनेत्री स्पहा जोशी दिसत आहे. या जोडीच्या या नाटकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे.