आपल्या सर्वांसाठीच पाणी किती महत्वाची बाब आहे हे तर आपण जाणतोच. पाण्या आभीवी दुष्काळामध्ये काही जणांना आपला जीवही गमवावा लागला होता. आता अभिनेत्री माधुरी देसाईने पाण्याचा प्रश्न पुन्हा सर्वांसमोर मांडला आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करा असे तर अनेक कलाकारांनी एनेकदा सांगितलेच आहे. त्यामुळेच की काय पाणी का टिका हा उपक्रम सुरु करण्यात आला असावा. या उपक्रमा अंतर्गत सहभागी असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप विशेष आहे. नुकतेच त्यांनी एक वेबसाईट लॉन्च केली. या वेबसाईटवर क्लिक केल्यावर ती नक्की कशाशी संबंधित आहे आणि त्यामध्ये काय नमूद करण्यात आले आहे हे कळेल. पाण्याच्या अभावी ज्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या पत्नीच्या भावना काय असतील? म्हणजेच दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी नेमके त्यांना काय वाटत असेल, हा प्रश्न आपसूक मनात येतो. आपल्या महाराष्ट्रात असं म्हणतात की, देव दिवाळी पर्यंत दिवाळी हा सण साजरा केला जातो म्हणजेच नोव्हेंबर अखेरी पर्यंत दिवाळी असते. या प्रोजेक्ट अंतर्गत दु:खात असलेल्या महिलांसाठी एक पाऊल उचलण्यात येणार आहे. पानी का टिका यांनी पब्लिश केलेल्या व्हिडीयोमध्ये मराठी सिनेनाट्यसृष्टीतील अभिनेत्री माधुरी देसाईने अभिनय केला आहे. एकंदरीत विदभार्तील स्त्रियांच्या मानसिकतेचा आढावा माधुरीच्या सुंदर अभिनयातून अनुभवण्यात आला. माधुरीच्या या व्हिडीयोने अनेक जण नक्कीच भावूक झाले असतील यात काही शंका नाही. माधुरीने केलेले हे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे पाहायला मिळतेय. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटूंबावर काय परिस्थिती ओढवते याचा आपण विचारही नाही करु शकत. त्यांच्यासाठी काहीतरी काहीतरी करण्याची गरजच होती. अता पाणी का टिका या उपक्रमा अंतर्गत अभिनेत्री माधुरी देसाईने उचललेले पाऊन नक्कीच यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
माधुरीने असे केले तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 14:53 IST