Join us

​ चित्रपट महोत्सवांविषयी काय म्हणाले जब्बार पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 12:48 IST

 चित्रपट महोत्सव हे एका वाहनासारखे आहे आणि या वाहनातून रसिक प्रेक्षकच नव्हे, तर नागरिकांनाही वेगवेगळे विषय उलगडत जातात. या ...

 चित्रपट महोत्सव हे एका वाहनासारखे आहे आणि या वाहनातून रसिक प्रेक्षकच नव्हे, तर नागरिकांनाही वेगवेगळे विषय उलगडत जातात. या महोत्सवादरम्यान जर आठवणींचे भाष्य झाले, तर विषयांचा उलगडा अधिक चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे प्रत्येक महोत्सवात आठवणींचे भाष्य व्हायलाच हवे, असा आग्रह करताना ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट महोत्सवाची उदाहरणे दिली. नागपूर शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या आॅरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी साधलेला संवाद एका दिग्दर्शकातील माणूसकीची वेगळीच ओळख दाखवून गेला. चित्रपटाच्या विषयापासून, तर तो विषय त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल.  डॉ. पटेल यांनी आॅगस्टमध्ये नागपुरातील तरुणाईसाठी घेतलेली कार्यशाळा अशीच छाप सोडून गेली होती. त्याची आठवण त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली. नागपुरातील तरुणाईतील कलाकौशल्य व वेगळेपणाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे काय, हे अनेकांना ठाऊकच नाही. मात्र, नागपुरात पहिल्यांदाच आयोजित या महोत्सवामुळे आणि त्यात सादर होणाºया शॉर्ट फिल्म्समुळे ते कळेल. चित्रपटाचे कॉस्टिंगही बरेच कमी झाले आहे आणि त्यामुळे तरुणाई समोर आली आहे आणि त्यांच्याकडे विषयांचे वैविध्यसुद्धा आहे. आॅरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात असेच नवनव्या विषयांवरील चित्रपट पहायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपुरात पहिल्यांदाच २७, २८ व २९ जानेवारीला आॅरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची धुरा दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्यावर आहे.