Join us

​ सईने कोणते पुस्तक वाचले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 12:50 IST

 पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात भर पडावी असे काही जणांना वाटते. तर काहीजण आवड आणि छंद म्हणून पुस्तके वाचतात. वाचनाने ...

 पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात भर पडावी असे काही जणांना वाटते. तर काहीजण आवड आणि छंद म्हणून पुस्तके वाचतात. वाचनाने नक्कीच माणसाच्या विचारात फरक पडतो हे काही नाकारता येणार नाही. आज मराठी चित्रपटसृष्टीत देखील असे अनेक कलाकार आहेत ज्यांना वाचनाची भारी आवड आहे. पण काही कलाकार तुम्हाला असे सापडतील ज्यांनी पुस्तके वाचलीच नाहीत. किंवा एखादं दुसरे पुस्तक वाचले असेल. अशीच एक अभिनेत्री सध्या आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत आहे. होय, या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात आत्तापर्यंत फक्त दोनच पुस्तके वाचली आहेत. वजनदार अभिनय करुन मराठी चित्रपटसृष्टीत अव्वल स्थान पटकाविलेली आपली सई ताम्हणकर वाचनाच्या बाबतीच जराशी मागे आहे. सईने आजपर्यंत फक्त दोनच पुस्तके वाचल्याचे समजत आहे. एक इंग्रजी पुस्तक तिने पहिल्यांदा वाचले होते. तर आता काही दिवसांपुर्वीच सईने महाभारत हे ४०० पानांचे पुस्तक वाचलेले आहे. या गोष्टीचा खुलासा स्वत: सईने लोकमत सीएनएक्सशी बोलताना केला आहे. सई नुकतीच उत्तरांचलला ट्रीप एंजॉय करायला गेली होती. या ट्रीप दरम्यान सईने स्वत:ला जास्तीत जास्त वेळ दिला. याच वेळी तिने महाभारत हे पुस्तक वाचण्यासाठी घेतले होते. याविषयी सई सांगते, मला वाचनाची जास्त आवड नाही. मला कधी वाटलेही नव्हते की मी महाभारत सारखे पुस्तक कधी वाचीन. परंतू या ट्रीपमध्ये मी हे ४०० पानांचे पुस्तक अवघ्या ७ दिवसांत वाचून काढले आहे याचे मलाच आश्चर्य वाटते. पुस्तक वाचताना मी त्यामध्ये एकवटलेली होते. ते पुस्तक मला खाली ठेवावेसेच वाटत नव्हते म्हणुनच मी ते वाचून लवकरच पूर्ण केले. कलाकारांना त्यांच्या व्यस्त शेड्युल्डमुळे वाचनाला फारसा वेळ देता येत नाही ही गोष्ट खरीच आहे. परंतू सईने वेळ काढून वाचन केले आहे. आता पुढे सई कोणते पुस्तक वाचणार हे आपल्याला लवकरच समजेल.