Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मधुराचे आगामी २ मराठी चित्रपट कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 20:38 IST

गायत्री किर्तणे  म्हणून ज्या अभिनेत्रीची ओळख आहे ती अभिनेत्री म्हणजे मधुरा देशपांडे.  झी मराठी वाहिनीवरील असे हे कन्यादान मालिकेतील ...

गायत्री किर्तणे  म्हणून ज्या अभिनेत्रीची ओळख आहे ती अभिनेत्री म्हणजे मधुरा देशपांडे.  झी मराठी वाहिनीवरील असे हे कन्यादान मालिकेतील गायत्री किर्तणे या प्रमुख भूमिकेतून मधुराने प्रेक्षकांचे मन जिंकले.  ही मालिका एक गोड आठवण म्हणून जशी प्रेक्षकांच्या मनात राहिली तशी ती मधुराच्याही मनात राहिली.  मालिकानंतर दोन मराठी चित्रपटांतून मधुरा परत एकदा तिच्या फॅन्सना दिसणार आहे. मधुरा देशपांडे सांगते, “असे हे कन्यादानच्या वेळी जसे माझे मालिकेच्या टिमसोबत कनेक्शन होते तसे ते अजूनही आहेत.  आम्ही भेटतो, बोलतो, धमाल करतो. सुरुवातील शरद पोक्षें सरांसोबत टेन्शन आलेलं पण नंतर आमचं सगळ्यांचं छान जमलं. आता माझे दोन चित्रपट येत आहेत. त्यापैकी एक ‘& जरा हटके’ हा चित्रपट आहे ज्याचं दिग्दर्शन प्रकाश कुंटे व निर्मिती रवि जाधव यांनी केले आहे आणि दुसरा चित्रपट समीर जोशी दिग्दर्शित ‘बस स्टॉप’ हा आहे.  मला सगळेच रोल करायचे आहेत.  नेगेटिव्ह, डॅशिंग, शहरी-ग्रामीण भागातील रोल करायचा आहे.  तसेच नाटक पण करायचं आहे.”आता मधुराच सांगतेय की तिचे दोन चित्रपट येत आहेत म्हणजे आता फॅन्स आतुरतेने मधुराच्या चित्रपटाची वाट पाहतील.  अभिनेत्री मधुरा देशपांडेला तिच्या ‘& जरा हटके’ आणि  ‘बस स्टॉप’ या दोन्ही चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!