रिंकू राजगुरू मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने सैराट चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि या चित्रपटातून ती एका रात्रीत लोकप्रिय झाली. तिचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. नुकतेच रिंकू राजगुरूने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आई-वडिलांसोबतच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
रिंकू राजगुरू म्हणाली की, "आम्ही जितकं एकमेकांवरती प्रेम करतो, आज आम्ही तितकं भांडतो. पण आम्ही रुसतो, पण आम्ही बोलत पण नाही. मग आम्ही पुन्हा एकमेकांशी फोन करून जरा गोड बोलतो. हे आणि आपलं माणूस म्हटलं तर ते असावंच ना?"
ती आपल्या आई-वडिलांसोबतच्या नात्याला सर्वात जास्त महत्त्व देते. याबद्दल बोलताना रिंकूने सांगितले, "जर जगच तुमच्याशी तसं वागतंय, तर आई-वडिलांनी म्हणजे का ते वागतील? मी पहिली त्यांची मुलगी आहे, नंतर मी बाकीच्यांची आहे. तर नाही, हे आहे." रिंकूच्या या वक्तव्यातून तिच्या आणि तिच्या आई-वडिलांमधील खास आणि जिव्हाळ्याचे नाते स्पष्टपणे दिसून येते. यश आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरही ती आपल्या कुटुंबासोबतच्या नात्याला किती महत्त्व देते, हे तिने या मुलाखतीत अधोरेखित केले.
वर्कफ्रंटरिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, 'सैराट'नंतर तिने काही हिंदी वेबसीरिजमध्येही काम केलं. तसेच ती 'कागर','झुंड','२०० हल्ला हो' या चित्रपटांमध्येही दिसली. या चित्रपटांना हवं तसं यश मिळालं नाही. २०२३ साली रिलीज झालेल्या 'झिम्मा २'ला चांगला प्रतिसाद मिळाला. यातील रिंकूच्या कामाचं कौतुक झालं. शेवटची ती 'बेटर हाफची लव्ह स्टोरी' या सिनेमात दिसली. त्यानंतर लवकरच ती 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'मध्ये झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासह भरत जाधव, अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे कलाकार झळकणार आहेत.
Web Summary : Rinku Rajguru shared her bond with her parents, highlighting the love and arguments. Despite disagreements, their relationship remains strong. Rinku emphasizes family first, career second.
Web Summary : रिंकू राजगुरू ने अपने माता-पिता के साथ अपने बंधन को साझा किया, जिसमें प्यार और तकरार पर प्रकाश डाला गया। असहमति के बावजूद, उनका रिश्ता मजबूत है। रिंकू परिवार को पहले और करियर को बाद में महत्व देती हैं।