Join us

​पहा : मन सुन्न करणारा मंगेश देसाईचा ‘देवदास’ ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 12:36 IST

‘तुझं लग्न हे माझे स्वप्न होतं आणि ते मी पाहिलंही. पण तुझ्या रुपाच्या आणि मनाच्या सौंदर्यात इतका वाहून गेलो, की नवऱ्याच्या रुपात ....

 ‘तुझं लग्न हे माझे स्वप्न होतं आणि ते मी पाहिलंही. पण तुझ्या रुपाच्या आणि मनाच्या सौंदर्यात इतका वाहून गेलो, की नवऱ्याच्या रुपात मलाच पाहायला विसरुन गेलो. आता तर साठलेल्या अश्रुंना पाऊलवाटही सापडत नाही गं...त्या अश्रूंची विहीर कधी तुला पाहायला मिळाली असती तर माज्या दुख:चा अंदाज तरी तुला लावता आला असता. मी काय करेन माहिती आहे ? मी नक्की न रडताच...श्वास सोडेन. कारण मेल्यानंतर माझा आत्मा जेव्हा त्या देवांशी समोरासमोर भांडेल ना, तेव्हा माझे साठलेले अश्रू त्या देवांना भारावून टाकणारे आणि संख्येने कधीही न संपणारे प्रश्न विचारतील...आणि कदाचित तेव्हा तरी तो मला उत्तर देऊ शकेल की त्याने माझं लग्न तुज्याशी का नाही लावून दिलं....!’ हे डायलॉग आहेत मंगेश देसाईचे आणि तेही त्याच्या आगामी मराठी ‘देवदास’ चित्रपटातील. हे डायलॉग नक्कीच मन सुन्न करणारे आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ज्येष्ठ बंगाली साहित्यिक शरतचंद्र चॅटर्जी यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ या कादंबरीवर या चित्रपटाची निर्मिती होत असून मराठीतील प्रतिभावान अभिनेता मंगेश देसाई देवदासच्या मुख्य व्यक्तिरेखेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ऋतुराज धालगडे करणार आहेत.