'गुलकंद' सिनेमाची (gulkand movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. प्रसाद ओक-ईशा डे, समीर चौघुले- सई ताम्हणकर या चौघांची हटके जोडी प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येत आहे. 'गुलकंद' सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचे सर्वेसर्वा सचिन गोस्वामी - सचिन मोटे यांनी सांभाळली आहे. गाणी, कथानक आणि कलाकारांचा हटके अभिनय यामुळे 'गुलकंद'ची चांगलीच चर्चा आहे. अशातच 'गुलकंद' सिनेमा प्रेक्षकांना ९९ रुपयांत बघायला मिळणार आहे.
'गुलकंद'ची खास ऑफर
'गुलकंद' सिनेमाच्या खास ऑफरबद्दल सांगायचं तर हा सिनेमा प्रेक्षकांना ९९ रुपयांत बघायला मिळणार आहे. ही ऑफर फक्त आज मंगळवार पर्यंतच लागू आहे. त्यामुळे सध्या थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसादात सुरु असणाऱ्या 'गुलकंद' सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होईल, यात शंका नाही. त्यामुळे या खास ऑफरचा प्रेक्षक आज आनंद घेऊ शकतात, यात शंका नाही. त्यामुळे आज सिनेमाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळणार, यात शंका नाही
'गुलकंद'ची कमाई किती
'गुलकंद' सिनेमा रिलीज होऊन आता ५ दिवस झाले. या सिनेमाने ५ दिवसांमध्ये २ कोटींचा व्यवसाय केला आहे. 'गुलकंद' सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढत जात आहे. 'गुलकंद' सिनेमाबद्दल सांगायचं तर सचिन गोस्वामींनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून सचिन मोटेंनी सिनेमाचं लेखन केलं आहे. या सिनेमात सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे, मंदार मांडवकर, वनिता खरात या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ज्यांनी हा सिनेमा पाहिला त्या सर्वांना हा सिनेमा आवडलेला दिसतोय.