Join us

आवाज डीजेचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 04:52 IST

मराठी चित्रपटाप्रमाणेच मराठी गाण्यांनादेखील चांगले दिवस आले आहेत. बॉलिवुडप्रमाणेच मराठी गाण्यांचीदेखील चर्चा दिसते. सध्या तर एकशे एक मराठी गाण्यांनी ...

मराठी चित्रपटाप्रमाणेच मराठी गाण्यांनादेखील चांगले दिवस आले आहेत. बॉलिवुडप्रमाणेच मराठी गाण्यांचीदेखील चर्चा दिसते. सध्या तर एकशे एक मराठी गाण्यांनी तरूणांना आकर्षित करून घेतले आहे. तुझ्या रूपाचं चांदण, पोपट पिसटला, शांताबाई, गुलाबाची कळी, मिरगाचा महिना गं,जीवाची दैना या गाण्यानंतर आता, थेट टॉप वन गाणं म्हणजे आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ या गाण्याने तर संपूर्ण महाराष्ट्राच धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यत या गाण्याची चर्चा ऐक ण्यास मिळते. लग्न, पार्टी, रिसेप्शन, वाढदिवस अशा छोटया मोठया कार्यक्रमात देखील आवाज डीजेचा.....हे गाणे समीर पाटील दिग्दर्शित पोस्टर गर्ल या चित्रपटातील हे गाणे आहे. गायक आनंद व आदर्श शिंदे यांच्या आवाजातील असून संगीत अमितराज यांनी दिले आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहे.