Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अॅप लग्नच्या निमित्ताने विश्वास जोशीची नवी इनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2017 17:08 IST

'व्हॉट्स अॅप' हा आजच्या तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय. आजची पीढी तासनतास व्हॉट्स अॅपवर बिझी असते. व्हॉट्स अॅप जणू काही तरुणाईचं ...

'व्हॉट्स अॅप' हा आजच्या तरुणाईचा जिव्हाळ्याचा विषय. आजची पीढी तासनतास व्हॉट्स अॅपवर बिझी असते. व्हॉट्स अॅप जणू काही तरुणाईचं तहान-भूक बनलं आहे.असाच एक दुसरा विषय म्हणजे लग्न. लग्नाबाबतही आजची पीढी जागरुक आणि तितकीच संवेदनशील आहे.'व्हॉट्स अॅप' आणि 'लग्न' या दोनही बाबतीत आजची पिढी अतिशय जागरूक आणि संवेदनशील आहे. 'व्हॉट्स अॅप' आणि 'लग्न' याबद्दल तरुणाईचा दृष्टीकोन मांडणारा नवा सिनेमा आता रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'व्हॉट्सअप लग्न'  असं या सिनेमाचं नाव असेल. नुकतंच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. अभिनेता नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत हा मुहूर्त संपन्न झाला. आता या सिनेमाच्या शूटिंग सुरू आहे. 'नटसम्राट' या सिनेमाची निर्मिती करणारे विश्वास जोशी या सिनेमाच्या माध्यमातून नवी इनिंग सुरु करत आहेत. 'व्हॉट्सअप लग्न'  या सिनेमाचं दिग्दर्शन विश्वास जोशी करणार आहेत. यावेळी नाना पाटेकर यांनी विश्वास जोशी यांच्या नव्या इनिंगला शुभेच्छा दिल्यात.  वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे,विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, ईला भाटे, वीणा जगताप या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची कथा विश्वास जोशी यांची असून पटकथा अभिराम भडकमकर यांची आहे. सिनेमाचे संवाद विश्वास जोशी, मिताली जोशी आणि अश्विनी शेंडे यांचे आहेत.सिनेमाला निलेश मोहरीर आणि टॉय आरिफ यांचं संगीत लाभलंय. सिनेमाची गीतं क्षितीज पटवर्धन आणि अश्विनी शेंडे यांनी लिहली आहेत. तर या सिनेमासाठी फुलवा खामकर यांनी कोरियोग्राफरची जबाबदारी सांभाळलीय. फिनक्राफ्ट मीडिया अॅण्ड एन्टरटेंन्मेंट प्रा. लि. आणि व्हिडिओ पॅलेसनं या सिनेमाची निर्मिती केलीय.