Join us
Daily Top 2Weekly Top 5

वज्र चित्रपटात समर्थ बारी साकारणार खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 14:14 IST

मयूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक रहस्यमयकथा पाहायला मिळणार आहे. तसेच ...

मयूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक रहस्यमयकथा पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात प्रेक्षकांना अभिनेत्री मानसी नाईकचा एक झक्कास मुजरादेखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता समर्थ बारी हा खलनायकाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. त्याच्या या भूमिकेविषयी अभिनेता समर्थ बारी सांगतो. या भूमिकेला डार्क शेड होती. मात्र ती खूप नैसर्गिकपणे आणि सहजतेने करणं गरजेचं होतं त्यासाठी मी तसा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझा हा प्रयत्न प्रेक्षकांना रूपेरी पडदयावर पाहायला मिळेल. मीदेखील माझी ही भूमिका पाहाण्यासाठी खूपच उत्सुक आहे. तसेच  हा माझा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या टीम बद्दल एवढंच सांगेल कि, सर्वांचा उत्साह आणि कामाबद्दलचा प्रामाणिकपणा पाहता, मला या टीम बरोबर परत काम करायला नक्कीच आवडेल. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट छोटा असो व मोठा, माज्यासाठी भूमिका महत्वाची आहे. मिळालेलं काम प्रामाणिकपणे केला की भविष्याची काळजी करावी लागत नाही. हे सूत्र मी या आधी पण फॉलो केलंय आणि या पुढे हि करत राहीन. म्हणून या गोष्टीचा फायदा मला नक्कीच भविष्यात होईन.  तर या चित्रपटातील अभिनेता अभिनीत पंगे सांगतो,  मयूर  करंबळीकर , दिनेश पवार आणि संपूर्ण टीमचं काम फार कौतुकास्पद आहे. टीम यंग असल्यामुळे काम करायला खूप मज्जा आली. सेट वर नेहमी एनर्जेटिक वातावरण होत . त्यामुळे शूट करतांना कधीच कंटाळा आला नाही.  खूप छान अनुभव होता . सगळ्यांनी हा चित्रपट एकदा तरी बघावा असे मला वाटते.