Join us

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अत्यवस्थ; पुण्यातील रुग्णालयात सुरू आहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 00:06 IST

दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती  स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. 

विक्रम गोखले यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड, मराठी सिमेमांना अनेका भूमिका गाजवल्या आहेत. अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. सिनेमांमध्ये मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय त्यांनी आजवर दिला आहे. त्याचा मोठा चाहता वर्गही आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला आहे. 

अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले आहेत. त्यांची स्टार प्रवाह वरची 'अग्निहोत्र' हि मालिका विशेष गाजली होती. सध्या ते 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांतून त्यांनी रंगभूमीवर एक मोठा काळ गाजवला आहे. मागील महिन्यातच ३० ऑक्टोबरला त्यांनी वाढदिवस साजरा केला होता.  

टॅग्स :विक्रम गोखले