विदया बालन म्हणते मला मराठी येते, पण मी बोलणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 15:16 IST
बॉलीवूडची तगडी अभिनेत्री विद्या बालन ही आता, एका मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. भगवान दादांवर आधारित असलेल्या ...
विदया बालन म्हणते मला मराठी येते, पण मी बोलणार नाही
बॉलीवूडची तगडी अभिनेत्री विद्या बालन ही आता, एका मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. भगवान दादांवर आधारित असलेल्या या चित्रपटात विद्या अभिनेत्री गीता बाली यांची भूमिका साकारली आहे. नुकताचं या चित्रपटातील गाणे लाँच करण्यात आले. त्यावेळी विद्याला सर्वांनी मराठीत बोल असा आग्रह केला. तेव्हा विद्या म्हणाली की, मला मराठी येतं, पण मी मराठीत बोलणार नाही. कारण मी जर मराठीत बोलले तर इतर अभिनेत्रींना असुरक्षित वाटेल. त्यानंतर विद्या हसत पुढे म्हणाली की, मी मुंबई या शहरात लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे साहजिकच मराठी मला थोड थोडं येत बोलता येते होते. होते. सातवीपर्यंत मला शंभर गुणांचे मराठी देखील होते. तसेच माझे अनेक नातेवाईक महाराष्ट्रीयन आहेत. माझा कर्मचारी वर्गदेखील मराठी आहे. मला मराठी कधीच परके वाटले नाही. मी मराठी चित्रपट देखील बघते. कट्टयार काळजात घुसली चित्रपट मी पाहिलाय. त्याचे चित्रीकरण, गाणी मला फारचं आवडली. मला अधूनमधून मराठी चित्रपटाबाबत विचारणा होते. पण त्यासाठी मला माझे मराठी अधिक सुधारण्याची गरज आहे. मराठी चित्रपटांसाठी मी कोणालाचं माझा आवाज डब करू देणार नाही. माझे डबिंग मीच करणार.