Join us

Video: 'क्यूँकि ड़र के आगे जीत है...'; मिताली मयेकरचा थरारक व्हिडीओ पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 19:46 IST

अभिनेत्री मिताली मयेकर(Mitali Mayekar)ने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत थरारक अनुभव शेअर केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंंती मिळताना दिसते. नुकताच तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने थरारक अनुभव घेतला आहे. याबद्दल तिने इंस्टाग्रामवर सांगितले आहे.

मिताली मयेकर हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, क्यूँकि ड़र के आगे जीत है.काही क्षणांसाठी तुमच्या डोक्यातून सर्वकाही काढून टाकणे आणि 83 मीटर उंचीवरून सोडणे हा किती आश्चर्यकारक अनुभव आहे. होय मी घाबरले होते, होय मी मागे हटण्याचा विचारदेखील केला. पण मी तसे केले नाही याचा मला आनंद आहे.

खरेतर मिताली मयेकर हिने ऋषिकेशमध्ये बंजी जंपिंगचा आनंद घेतला. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओवर तिचे कौतुक होताना दिसत आहे. ‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केले. शेवटची ती लाडाची मी लेक गं या मालिकेत झळकली होती.
टॅग्स :मिताली मयेकर