गायिका कविता राम यांचा फ्युजन साँग व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 14:40 IST
आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे.अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी ...
गायिका कविता राम यांचा फ्युजन साँग व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल
आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे.अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत.कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत. कविता यांनी "ये रिश्ता क्या कहलाता है", "गोदभराई", "मेरे घर आयी एक नन्हीं परी" "कैरी" " साथ निभाना साथिया" या मालिकांसाठी तर "या टोपीखाली दडलंय काय", "लाज राखते वंशाची", "दुर्गा म्हणत्यात मला","शिनमा" "थँक यू विठ्ठला", "नगरसेवक" "हक्क","लादेन आला रे" यांसारख्या मराठी तर "गब्बर इज बॅक", "सिंग इज किंग" या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.या जुन्या गाण्यांना नव्या रूपात म्हणजेच फ्युजनच्या रूपात सादर करून कविता यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली दिली आहे. कविता यांनी केलेल्या या नव्या फ्युजनच्या सादरीकरणाबद्दल आनंद शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आहे. खरंतर नावात खूप काही दडलेलं असतं.आचार-विचार, स्वभाव, मानसिकता असं बरंच काही स्पष्टपणे समजते. या कलेच्या दुनियेत कलाकार नाव कमावण्यासाठी येतात. त्यांच्या नावानेच त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असते.अनेक कलाकारांची नावं रसिकांच्या मनात घर करुन आहेत.कलाक्षेत्रात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आपले खरे नाव नाहीतर दुस-याच नावाने कलाक्षेत्रात नाव लौकीक मिळवणारे अशीच बरीच उदारणं आपल्या समोर आहेत. कलाक्षेत्रात करिअर घडवण्यासाठी अनेकांनी आपली नाव बदलेली आहेत.मुळात आता हा ट्रेंड मराठीतही रूढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही कलाकारांनी नावात बदल न करता अंकशास्त्राप्रमाणे नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करत असल्याचे पाहायला मिळते. तर काहींनी दुसरेच नाव लावत आपले नशीब आजमवताना दिसतात.