Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आणि मी पोलिसांना धडधडीत खोटं बोलले...' वीणा जगतापने सांगितला 'तो' भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:10 IST

वीणा जगतापने नुकतंच 'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील रिएलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.

अभिनेत्री वीणा जगताप मालिका आणि बिग बॉस मराठीमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. चाहते नेहमीच तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात.  ‘दिल दोस्ती दिवानगी’  चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. वीणा जगतापने नुकतंच 'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील रिएलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये वीणाने असं काही सांगितलं की, सर्वच पोट धरून हसू लागले. 

नुकताच 'चला हवा येऊ द्या' या  शोचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये वीणा जगताप, निलेश साबळे, श्रेया बुगडे आणि दिसून येत आहे. यावेळी विणाने पोलिसांशी धडधडीत खोटं बोलल्याचा एक भन्नाट किस्सा शेअर केला. ती म्हणते की, 'मी कॉलेजला होते आणि मी टुव्हिलर जायचे कॉलेजला. परत येताना आमच्याकडे व्हिन्स चौक लागतो.  एकदा परत येताना तिथे ट्रॅफिक पोलिसवाले उभे होते. त्यांनी मला बाजूला बोलावलं. माझ्याकडं लायन्स होतं, पण गाडीचेकागदपत्रे नव्हते. अरे यार आपल्याकडे पाच रुपये नाहीत, यांना ५० रुपये कोठून देऊ'.

पुढे ती म्हणते, 'तेव्हा मी त्यांना धडधडीत खोटं बोलले. मी त्यांना म्हटलं की, काका तुम्हाला माहितयं का माझे काका पोलिस आहेत. त्यांनी मला वडिलांचं नाव विचारलं तर मी त्यांना महेंद्र रामचंद्र जगताप असं नाव सांगितलं. शिवाय ते उल्हासनगरमध्ये पडताळणी करतील म्हणून मी त्यांना माझे वडिल ठाण्यात ड्यूटीला असल्याचं सांगितलं. माझ्या खोट्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि मला त्यांनी सोडलं'.  हा किस्सा ऐकताच विनोद साबळेसह सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात. 

वीणा जगताप आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. वीणा बिग बॉस मराठीच्या घरात असताना खूप चर्चेत आली होती. ती बिग बॉस मराठी शोमध्ये असताना तिच्या आणि शिव ठाकरेमध्ये प्रेम फुलले. इतकेच नाही तर घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर ते दोघे विभक्त झाले. वीणा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. 

 

वीणा जगतापने नुकतंच 'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील रिएलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.

टॅग्स :वीणा जगतापचला हवा येऊ द्यामराठी अभिनेतासेलिब्रिटी